agriculture news in marathi, Selling at half price of animals in Khandesh | Agrowon

खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्री
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

चाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्‍यात पिकांची दैना झाली आहे. अशातच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, चारा व पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे अक्षरशः निम्म्या किमतीत विकावी लागत आहेत. येथील शनिवारच्या आठवडे बाजारात आज मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी आली. दुभत्या जनावरांच्याही किमती घसरल्यामुळे पशुपालकांच्या पदरी निराशा आली होती.

चाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्‍यात पिकांची दैना झाली आहे. अशातच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, चारा व पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे अक्षरशः निम्म्या किमतीत विकावी लागत आहेत. येथील शनिवारच्या आठवडे बाजारात आज मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी आली. दुभत्या जनावरांच्याही किमती घसरल्यामुळे पशुपालकांच्या पदरी निराशा आली होती.

येथील बाजार समितीच्या आवारात दर शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात धुळे, जळगाव, मालेगाव, कन्नडसह इतर ठिकाणांहून गायी, म्हशी, बकऱ्या, बैल आदी जनावरांची आवक होते. तालुक्‍यात सुमारे दीड लाखांवर जनावरे आहेत. यंदा गिरणा परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्यामुळे चारा देखील कुठेही उपलब्ध नाही. चारा व पाण्यासाठी पशुपालकांना पायपीट करावी लागत आहे. नगदी पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे चाऱ्याची टंचाई दरवर्षी भासत आहे. तालुक्‍यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढलेले असून ज्वारी व शाळूचा पीक पेरा घटला आहे. त्यामुळे पावसाळा संपत आलेला असतानाच चाऱ्याची तीव्र टंचाई भासत आहे.

दुभत्या जनावरांचीही विक्री
चारा व पाणी नसल्यामुळे जनावरे सांभाळणे पशुपालकांना अवजड होत आहे. काही गावांमध्ये दूरवर जाऊनही पाणी मिळत नाही, अशी विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे दुभती जनावरे नाइलाजास्तव विकावी लागत आहे. आजच्या बाजारात बऱ्याच पशुपालकांनी दुभती जनावरे विक्रीला आणली होती. मात्र, त्यांनाही पाहिजे तसा भाव मिळला नसल्याचे पशुपालकांनी सांगितले. बऱ्याच जणांना निम्म्या किंमतीत दुभत्या गुरांची विक्री करावी लागली. तालुक्‍यातील काही भागात जेमतेम चारा व पाणी उपलब्ध असल्यामुळे त्याच भागात दुभती जनावरे दिसून येत आहे.

खिल्लारी बैलही विक्रीला
येथील बाजारात खिल्लार, मद्रासी, गावरान खिल्लार, रेंडी असे जातिवंत बैल सोलापूरसह कर्नाटकातून विक्रीसाठी येत असतात. यातून दर शनिवारी लाखोंची उलाढाल होते. बरेच शेतकरी केवळ हौस म्हणून दोन दोन लाखांचे बैल सांभाळतात. यंदा मात्र, चारा टंचाईने खिल्लारी बैलजोडी देखील विक्रीला आल्याचे दिसून आले.

इतर अॅग्रो विशेष
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...