agriculture news in marathi, Seminar on Soil fertility in pune today | Agrowon

जमीन सुपीकतेविषयी आज पुण्यात चर्चासत्र
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे : ''सकाळ-अॅग्रोवन''च्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात मंगळवारी (ता. १७) ''जपाल माती, तर पिकतील मोती'' या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र होत आहे. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे तसेच मृदातज्ज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे हे महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात दुपारी चार वाजता होणाऱ्या या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील शेतकरी, कृषी शाखेचे विद्यार्थी येत आहेत. 

पुणे : ''सकाळ-अॅग्रोवन''च्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात मंगळवारी (ता. १७) ''जपाल माती, तर पिकतील मोती'' या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र होत आहे. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे तसेच मृदातज्ज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे हे महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात दुपारी चार वाजता होणाऱ्या या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील शेतकरी, कृषी शाखेचे विद्यार्थी येत आहेत. 

''अॅग्रोवन'' यंदा तेरावा वर्धापन दिन साजरा करीत आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती, ज्ञान-तंत्रज्ञान, बाजारपेठांची माहिती, यशोगाथा सांगत शासनासमोर शेतीचे ज्वलंत प्रश्न बेधडकपणे ''अॅग्रोवन'' मांडत आहे. विशेष म्हणजे जमीन सुपीकतेच्या दुर्लक्षित प्रश्नाकडे शेती व्यवस्था व सरकारचे लक्ष वेधण्याचा अनोखा प्रयत्न ‘अॅग्रोवन’कडून केला जात आहे. सशक्त जमिनीशिवाय समृद्ध शेती शक्य नाही, हे ठसविण्यासाठी अॅग्रोवनकडून २०१८ हे वर्ष ''जमीन सुपीकता वर्ष'' म्हणून जाहीर केले गेले आहे. जमीन सुपीकतेच्या संकल्पनेला राज्यभर पोचविण्यासाठी या विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ते सर्वांसाठी खुले असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे सभागृहात प्रवेश मिळेल.   

येत्या २० एप्रिल रोजी चौदाव्या वर्षात पदार्पण करणारा अॅग्रोवन राज्यातील शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा सोबती बनला आहे. २००५ मध्ये सुरू झालेल्या ‘अॅग्रोवन‘ची भारतातील एकमेव कृषी दैनिक म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. गावशिवारातील शेतीच्या प्रयोगापासून ते जगभरातील शेती तंत्र, विज्ञान व संशोधनाची सखोल माहिती बांधावर पोचविणारा अॅग्रोवन शेतीबरोबरच सरपंच महापरिषदेसारख्या माध्यमातून ग्रामविकासाचाही दूत बनला आहे. वर्धापन दिनानिमित्त २० ते २२ एप्रिलदरम्यान तीन विशेषांकही प्रकाशित होत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...