agriculture news in marathi, Send a tanker proposal in two days after the order | Agrowon

मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव पाठवा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी (ता. १३) दिल्या.

देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दुष्काळ निवारण समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी (ता. १३) दिल्या.

देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दुष्काळ निवारण समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘जिल्ह्यात केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळच्या निवारणासाठी राज्य शासनाने आठ उपाययोजना निश्चित केल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होईल. अशा प्रकारची मागणी आल्यास त्याबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांत पाठवला जावा. प्रत्यक्ष पाहणी केली जावी.’’

‘‘चारा पिकविण्यासाठी प्राधान्य दिले जावे. खासगी क्षेत्रातील आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पिकवल्या जाणाऱ्या चाऱ्याबाबतची माहिती संकलित केली जावी,’’ अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, ‘‘पुढील मेपर्यंत जिल्ह्यात सुमारे ५४० टँकर आणि २१७ चारा छावण्या सुरू कराव्या लागतील. शासनाने निश्र्चित केलेल्या आठ उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. सर्व संबंधित विभागानी याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात.’’

बैठकीस उपजिल्हाधिकारी किशोर पवार, सचिन ढोले, मारुती बोरकर, प्रमोद गायकवाड, दीपक शिंदे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे भांजे, जीवन प्राधिकरणाचे चंदनशिवे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरूनिलंगा, लातूर ः पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने व...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...