agriculture news in Marathi, separate export policy will decide of state, Maharashtra | Agrowon

राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणार
विनोद इंगोले
रविवार, 19 मे 2019

निर्यात धोरण समितीचे गठण करण्यात आले आहे. त्याकरिता व्यापक काम होण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात मातीची पोषकता या घटकावरच राज्यभरात काम झाले पाहिजे. पूर्ण मूल्य साखळी निर्माण करावी लागेल. प्रशिक्षण, वाण निवड, पीक व्यवस्थापन, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान याविषयी देखील जागृतीचा अंतर्भाव करावा लागणार आहे. फुलशेती, फळशेती, पारंपरिक पीक, वनौषधी या घटकांचा निर्यातीसाठी प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे.
- सुहास दिवसे, कृषी आयुक्‍त, महाराष्ट्र

नागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे स्वतंत्र निर्यात धोरण जाहीर करण्यात येणार आहे. त्याकरिता कृषी आयुक्‍तांच्या अध्यक्षतेत नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

देशाची शेतीमाल निर्यात दुपटीने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत भारताची शेतीमाल निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ टक्‍क्‍यांनी घटली. किमतीमध्ये ५० टक्‍के घट होती. २०१६-१७ मध्ये २४९.७०२ टन गव्हाची निर्यात झाली.

एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत त्यात घट होत ही निर्यात १३५.२८४ टनांवर पोचली. नॉन बासमती तांदूळ व इतर शेतीमालाच्या बाबतीत देखील हेच घडले. त्यामुळे शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासोबतच निर्यात दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

यात आपला सहभाग नोंदविण्याकरिता महाराष्ट्राचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार केले जाणार आहे.  महाराष्ट्र राज्य हे द्राक्ष, डाळिंब, कांदा या शेतीमालाच्या निर्यातीत देशात क्रमांक एकवर आहे. त्यासोबतच केळी, भाजीपाला, तांदूळदेखील महाराष्ट्रातून निर्यात होतो. ही निर्यात वाढावी, याकरिता समिती निर्यात धोरणा अंतर्गत शिफारस करेल. 

समितीत यांचा आहे समावेश
समितीचे अध्यक्ष कृषी आयुक्‍त आहेत. सदस्यांमध्ये आयुक्‍त पशुसंवर्धन, आयुक्‍त दुग्ध व्यवसाय विकास, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार मंडळ, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, संचालक फलोत्पादन, डॉ. धनंजय परकाळे, सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक बी. एन. पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...