agriculture news in marathi, seri cocoon market to start in Jalna today | Agrowon

जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌घाटन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 एप्रिल 2018

औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. २१) राज्यातील पहिली प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष खरेदीची बाजारपेठेचे उद्‌घाटन केले जाणार आहे. याच दिवशी व्यापारी व अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन बाजारपेठ सक्षमरित्या चालविण्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधांवर चर्चा व निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. २१) राज्यातील पहिली प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष खरेदीची बाजारपेठेचे उद्‌घाटन केले जाणार आहे. याच दिवशी व्यापारी व अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन बाजारपेठ सक्षमरित्या चालविण्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधांवर चर्चा व निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली. 

जालना बाजार समितीच्या आवारातच रेशीम कोष खरेदीसाठी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जाणाऱ्या या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत कोष ठेवण्यासाठी जागा व प्रसंगी व्यापाऱ्यांना राहण्याची सोय, रेशीम कोष उत्पादकनांही आवश्‍यक सुविधा, इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर वजन, कोषांचे ग्रेडशन, चोवीस तासांत विकलेल्या कोषाचे पैसे मिळण्याची सोय या बाजारपेठेत असणार आहे. रामनगरमसह इतरही रेशीम मार्केटमध्ये असलेल्या सुविधा व त्या तुलनेत आवश्‍यक असणाऱ्या सुविधा याचाही अभ्यास व त्यादृष्टीने पावले उचलली जावीत म्हणून शनिवारी उद्‌घाटन सत्राबरोबरच दुपारी कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आलेल्या ४५ कोष खरेदीदारांशी त्यांना आवश्‍यक सोयीसुविधांबाबत अधिकारी चर्चा करणार आहेत.

राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जालन्यातील रेशीम कोष बाजारपेठेचे उद्‌घाटन होणार आहे. जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, या वेळी खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, वस्त्रोद्योगचे प्रधान सचिव अतुल पाटणी, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, रेशीम संचालनालयाचे संचालक  संजय कदम, रामनगरम रेशीम बाजारपेठेचे उपसंचालक जे. एन. मुन्शी, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, सर्व आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...