agriculture news in marathi, sericulture scheme status, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळमधील शेतकऱ्यांची रेशीम शेतीला पसंती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला पूरक उद्योग म्हणून रेशीम शेती चांगला पर्याय ठरू शकतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणखी एक हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.
यवतमाळ  : कपाशी पिकावर आलेल्या संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोंड अळीने तर आता शेतकऱ्यांसमोर नवे आव्हानच उभे झाले. येत्या हंगामात काय, असा प्रश्‍न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र या प्रश्‍नावर शेतकऱ्यांनीच उत्तर शोधले असून, त्यांनी रेशीम शेतीला पसंती दिली आहे. या हंगामात  तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
 
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करतात. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न तोकडे आहे. अशातच आता शेती मोठ्या संकटातून जात आहे. पिकांवर होणारा विविध रोग - किडींचा प्रादुर्भाव यानंतर हातात आलेल्या पिकाला मिळणारा कमी भाव ही स्थिती कायम आहे. त्यातच बीटी कापसावर बोंड अळीच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकटच उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आता या चक्रातून बाहेर पडून नवीन प्रयोग सुरू केले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
 
गतवर्षी जिल्ह्यात २०० एकरांवर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २१३ एकरांवर लागवड झाली. त्यातून ६३ हजार ३५० अंडीपुंजांची निर्मिती करून २७ मेट्रिक टनांचे उत्पादन झाले. पुढील वर्षासाठी २५० एकरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते. मात्र ते आता ५०० एकरांवर गेले. रेशीम शेतीसाठी पहिल्यांदाच एक हजार सात शेतकऱ्यांनी अर्ज सादर केलेत.
 
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यात लक्ष देऊन रेशीम संचालनालयाला उद्दिष्ट वाढवून दिले. शिवाय शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे हे उद्दिष्ट वाढविण्यात यश मिळाले. येत्या काळात आणखी किमान एक हजार अर्ज येतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
‘मनरेगा’मधून मजुरी मिळत असल्याने याला आणखी गती मिळण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील वातावरण रेशीमसाठी पोषण असल्याने कापसाला रेशीम पर्याय ठरू शकतो, अशी शक्‍यता रेशीम संचालयाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आता कपाशीची पर्याय म्हणून रेशीमला पसंती देत असल्याचे चित्र सध्या तरी आकडेवारीवरून दिसून येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...