agriculture news in marathi, series on milk crises in maharashtra | Agrowon

लिटरमागे ९ रुपयांचा तोटा सोसून शेतकरी विकतात दूध
मनोज कापडे
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग एक
पुणे : राज्याच्या दूध धंद्याचे खांब असलेले सहकारी दूध संघही तोट्यात जाऊन दुधाची खरेदी करत असतानाही दुसऱ्या बाजूला शेतकरीदेखील प्रतिलिटर ९ रुपये तोटा सहन करून दूध विकतो आहे. त्यामुळे दूध धंद्यात फायदा नेमका कुणाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग एक
पुणे : राज्याच्या दूध धंद्याचे खांब असलेले सहकारी दूध संघही तोट्यात जाऊन दुधाची खरेदी करत असतानाही दुसऱ्या बाजूला शेतकरीदेखील प्रतिलिटर ९ रुपये तोटा सहन करून दूध विकतो आहे. त्यामुळे दूध धंद्यात फायदा नेमका कुणाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

नैसर्गिक आपत्ती किंवा नापिकीमुळे राज्यातील शेती बहुतेक वेळा संकटात असते. संकटग्रस्त शेतकऱ्यांना केवळ दुग्ध व्यवसायानेच तारले आहे. शेतमालाचे रोजचे बाजारभाव कधीही कोसळतात; पण दर दोन आठवड्याने दूध संघाकडून न चुकता होणाऱ्या पेमेंटमुळे दूध धंद्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना कायम दिलासा मिळत गेला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी रोजचे दूध उत्पादन एक कोटी लिटर्सपेक्षा जादा पुढे नेले व यातून राज्यात धवलक्रांती घडवून आणली. 

राज्य शासनाने मात्र या धवलक्रांतीकडे गांभीर्याने कधीही पाहिले नाही, असा आरोप दूध क्षेत्रातील अभ्यासकांचा आहे. चांगल्या संघांना प्रोत्साहन व गैरकारभाराला लगाम घालणारे धोरण न ठेवल्यामुळे राज्याचा दुग्धविकास कार्यक्रम मोडित निघाल्याचे चित्र आहे. शेतीला उत्कृष्ट जोडधंदा म्हणून सरकारने वेळोवेळी धोरणात्मक आश्रय दिला नाही. सतत भाव घसरते राहिल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसाठी दुधाचा धंदा एक जुगार बनल्याचे दिसते आहे. 

‘‘दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुखणेच सरकारला कधी कळले नाही. ६० हजारांची गाय खरेदी करून आम्ही रोज सरासरी बारा लिटर दूध मिळवल्यास ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफला ३२४ रुपये हाती पडतात. शेणाचे उत्पादन ४० रुपये धरल्यास एकूण ३६४ रुपये शेतकऱ्याला मिळतात; मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आमचा उत्पादन खर्च ४७२ रुपयांपर्यंत गेला आहे’’, असे अहमदनगर दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सांगितले. 

शेतकरी जगला काय आणि मेला काय याच्याशी काहीच देणेघेणे नसल्यासारखे सरकार वागत आहे. त्यामुळेच शेतकऱ्याला आज रोज प्रतिजनावर १०८ रुपये तोटा सहन करावा लागत अाहे. २७ रुपये दर मिळूनही एका लिटरमागे ९ रुपये आणि खासगी दराप्रमाणे १८ रुपये तोटा सहन करून आम्ही दूध विकतो आहे. केवळ पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्याला जनावरे पाळावी लागतात. अन्यथा शेतीप्रमाणेच उजाड झालेल्या या दूध धंद्यात अडकून पडण्याची कोणत्याही शेतकऱ्याची इच्छा नाही. त्यात पुन्हा भेसळखोरांविरुद्ध शासन मूग गिळून बसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे, अशी हताश प्रतिक्रिया श्री. डेरे यांनी व्यक्त केली. 

भारतीय पशुखाद्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. दिनेश भोसले यांनी मात्र दुग्ध व्यवसायातील लॉबीकडून शेतकरी नागवला जात असल्याचे म्हटले आहे. सहकारी असो की खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांना तोटा होणार नाही, याची दक्षता घेत व्यवसाय केला पाहिजे. काहीही झाले की दुधाचे भाव पाडण्याची भूमिका शेतकऱ्यांना संकटात टाकणारी ठरते. चांगले दूध जादा भावाला विकावे आणि ग्राहकांनीही ते जादा भावाने विकत घ्यावे, असे आपल्याला वातावरण तयार करावेच लागेल, अशी सूचना डॉ. भोसले यांनी केली. 

दूध उत्पादन खर्च अाणि तोटा

 •      एका गायीमागे शेतकऱ्याचा रोजचा तोटा ः १०८ रुपये 
 •      २५ रुपयांप्रमाणे ५ किलो खाद्य ः१२५ रुपये 
 •      २५ रुपयांप्रमाणे दीड किलो पशुखाद्य ः ३७.५०रुपये
 •      तीन रुपयांप्रमाणे २५ किलो चारा ः ७५ रुपये 
 •      सहा रुपयांप्रमाणे पाच किलो वैरण ः ३०रुपये
 •      औषधोपचार ः २५ रुपये
 •      बॅंकेचे व्याज ः २० रुपये 
 •      मिनरल मिक्श्चर ः १० रुपये 
 •      मजुरी ः ६० रुपये
 •      वीजबिल ः १० रुपये 
 •      उदरनिर्वाह ः ५० रुपये 
 •      घसारा ः ३० रुपये
 •      एकूण उत्पादन खर्च ः ४७२ रुपये 
 •      मिळणारे उत्पादन ः ३६४ रुपये

खासगी डेअरीचालक संकटात; शेतकरीही हैराण
कात्रज दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, की राज्याच्या दूग्ध उद्योगात सध्या कमालीचा गोंधळ झालेला आहे. संघ तोट्यात, सोसायट्या डब्यात, खासगी डेअरीचालक संकटात आणि शेतकरी हैराण झालेले दिसत आहेत. दूध धंद्याचा मूळ प्रश्न समजावून घेण्याची तयारी शासनाची तयारी दिसत नाही. राज्यात आज जातीवंत गाय-म्हशींची पैदास, कृत्रिम गर्भधारणा, औषधोपचार आणि विमा उपलब्धतेबाबत कायमस्वरूपी काहीच धोरण नाही. नर वासरांची सोय नाही, भाकड जनावरांची दैना आणि गोशाळा नाहीत. अशा स्थितीत गोवंश हत्याबंदीच्या कायद्याखाली शेतकरी भरडला जात आहे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले. महाराष्ट्रात अतिरिक्त दूध आणि पावडरविषयी काही धोरण नसल्यामुळे शेतकरी तोट्यात जातो, असेही ते म्हणाले. 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...