agriculture news in marathi, Series on milk crises in maharashtra | Agrowon

दूध धंद्याला बसले ‘जीएसटी’चे चटके
मंदार मुंडले
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

 विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ३

पुणे : दूध धंद्याला सरकारी आश्रय देण्याऐवजी जीएसटीचे चटके सरकारकडून देण्यात दिले जात आहेत. दूध खरेदीदरात अचानक बदल करताना दूध संघ आणि प्रक्रिया उद्योगातील नफ्या-तोट्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे राज्यात दुधाचे खरेदीदर पाडले गेले आणि शेतकऱ्यांची उघड लूट झाल्यामुळे समस्या वाढल्या आहेत.

 विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ३

पुणे : दूध धंद्याला सरकारी आश्रय देण्याऐवजी जीएसटीचे चटके सरकारकडून देण्यात दिले जात आहेत. दूध खरेदीदरात अचानक बदल करताना दूध संघ आणि प्रक्रिया उद्योगातील नफ्या-तोट्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे राज्यात दुधाचे खरेदीदर पाडले गेले आणि शेतकऱ्यांची उघड लूट झाल्यामुळे समस्या वाढल्या आहेत.

दुधाच्या प्रक्रिया पदार्थांवर वाढीव जीएसटी लावल्यास त्याची वसुली डेअरीचालक शेवटी शेतकऱ्यांकडून किंवा ग्राहकांकडूनच करणार होते. तूप आणि बटरवर १२ टक्के जीएसटी लावताच डेअरीचालकांनी खर्चवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचे भाव कमी केले. आधीच दूध पावडरचे बाजार कोसळलेले असल्यामुळे डेअरीचालकांनाही शेतकरीविरोधी निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की राज्यातील तीन कोटी लिटरपैकी फक्त २७ हजार लिटर दुधाची खरेदी शासन करते. त्यात पुन्हा कोट्यवधी रुपयांचा तोटा होतो व तो सरकारी तिजोरीतून भरला जातो. सरकार कशाच्या आधारे २७ रुपये खरेदी दराची सक्ती करते आणि विक्रीभावदेखील न वाढवण्याचे आग्रह का धरला जातो हेच कळत नाही. या प्रश्नाकडे केवळ राजकीय नजरेने पाहिले जात आहे. डुबले तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेच दूध संघ बुडतील अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, हा प्रश्न राजकीय नसून शेतकऱ्यांचा आहे, हे समजून घ्यावे लागणार आहे.

खासगी डेअरीचालकांना स्वतःच्या नफा-तोटा पत्रकाकडे दुर्लक्ष करून कधीही व्यवसाय करता येत नाही. खासगी डेअरीचालक आज २१ ते २३ रुपये लिटर भाव देत आहेत. उलट संघ सरकारी दर देत नसल्यामुळे कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. खासगी चालकांनी दूध पावडरचा बाजार तेजीत असताना यापूर्वी प्रतिलिटर २८ रुपये दर शेतकऱ्यांना दिला होता. त्या काळात सरकारी दर २२ रुपये इतका असतानाही जादा भाव दिला गेला होता. डेअरीचालकांना सध्याचा खर्च परवडत नसल्यामुळेच आम्ही २७ रुपये दर देऊच शकत नाही, असेही श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले. 

दूध पावडर दराचा फटका
दूध आणि दुग्धपदार्थनिर्मिती उद्योगाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला जात नाही. देशात दरवर्षी शेतकऱ्यांकडून १५५ दशलक्ष टनांची निर्मिती केली जात असल्यामुळे दुग्ध व्यवसायातील उलाढाल साडेसहा लाख कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. देशातील ९ कोटी कुटुंबाचा उदरनिर्वाह डेअरी व्यवसावरच चालतो. दूध पावडरचे दर काही दिवसांत १८५ रुपये प्रतिकिलोवरून १५० रुपयांवर आलेले आहेत. त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होत असल्यामुळे सरकारने गांभीर्याने या समस्येकडे पाहावे, असेही डेअरी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.
 

तूपनिर्मितीत बसलेला फटका ३२०- २९३ 
(२७ रुपये/किलो)
दूध पावडरनिर्मितीमधील फटका १८५- १५० 
(३५ रुपये/किलो
जीएसटीमुळे एकूण बसत 
असलेला फटका 
२७+३५=६२ रुपये/किलो

जीएसटीमुळे प्रक्रियायुक्त पदार्थनिर्मिती व शेतकरी वर्गाला फटका

तपशील जीएसटीच्या आधी जीएसटीनंतरचा दर 
तुपाची किरकोळ विक्री (प्रतिकिलो) ५५० ५५० 
कर  २६ ५९
रिटेलरला मिळणारी किंमत ५२४  ४९१
रिटेलर व डिस्ट्रिब्युटर्सचा नफा १२४ १२४
एक्सफॅक्टरी म्हणजे डेअरीतील मूल्य ४०० ३६७
बटरमधून मिळणारे मूल्य ३२० २९३
शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर २७ २२

‘तूप, बटरवरील वाढीव जीएसटी हटवा’
तूप व बटरवरील वाढीव जीएसटी हटवावा, अशी मागणी डेअरीचालकांची आहे. इंदापूर डेअरी तसेच सोनई डेअरीने ही समस्या मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. जीएसटीचा फेरविचार करण्याचे केंद्र सरकार सांगत असले तरी तशी अधिसूचना १४ नोव्हेंबरपर्यंत निघालेली नव्हती. खाद्यतेलाप्रमाणेच बटर आणि तुपावरील कर हा आधीसारखा म्हणजेच पाच टक्के केला तरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे डेअरीचालकांचे म्हणणे आहे.  

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...
प्लॅस्टिक, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदीमुंबई : राज्यात प्लॅस्टिक; तसेच थर्माकोलपासून...
जिवाशी खेळ थांबवाराज्यातील भेसळयुक्त दूधविक्रीचा प्रश्न चालू...
अवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञस्टीफन हॉकिंग २००१च्या नवीन वर्षाच्या ...
कृषिपंपांच्या वीजबिलाबाबतचे 'महावितरण'...मुंबई : कृषिपंपांसाठी येणाऱ्या वीजबिलाने...
ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्‍...महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल तर अरबी...
भारतातील दहा कोटी जनता पितेय दूषित पाणीनवी दिल्ली : रंग, गंधहिन द्रव्य म्हणजेच पाणी...
ढगाळ हवामान, आजही पावसाची शक्यतापुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक...
पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा...लातूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अवघे...पुणे : सातत्याने होणारे हवामान बदल, वाढता कीड-...