agriculture news in marathi, Serious allegations of assistant on agriculture officer | Agrowon

कृषी अधिकाऱ्यावर सहायकांचे गंभीर आरोप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नागपूर  : एटापल्ली (जि. गडचिरोली) येथील तालुका कृषी अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचा अमानवीय छळ करीत असल्याचा आरोप राज्य कृषी सहायक संघटनेने केला आहे. हा छळ न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागीय कृषी सहसंचालकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

नागपूर  : एटापल्ली (जि. गडचिरोली) येथील तालुका कृषी अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचा अमानवीय छळ करीत असल्याचा आरोप राज्य कृषी सहायक संघटनेने केला आहे. हा छळ न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागीय कृषी सहसंचालकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, तालुका कृषी अधिकारी अधिनस्त कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर काढत नाहीत. काही कृषी सहायकांचे वेतन त्यांनी हेतुपुरस्सपणे पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांकडून त्यांचे निहीत स्वार्थ पूर्ण होत नसल्याने हा विरोध केला जात आहे. थकीत वेतनाविषयी विचारणा केल्यानंतर त्यांना १-४ प्रपत्र भरून निलंबीत करण्याची धमकी दिली जाते.

या संदर्भात वाच्यता केल्यास पाहून घेईल, अशी दमदाटी करून अपमानास्पद वागणूक देतात. भीतीपोटी त्यांच्याकडून होणारा हा सारा छळ कर्मचारी सहन करतात. परंतु, सततच्या या वागणुकीमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ धोक्‍यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

आपल्या स्वार्थाकरिता ते मर्जीतील कृषी सहायकाला मृद व जलसंधारण कामासाठी प्रतिनियुक्‍ती देतात मात्र अधिनस्त कृषी सहायक कामे सांभाळण्यास समर्थ असताना त्याचे मत जाणून न घेता फक्‍त मृद व जलसंधारण कामाकरिता प्रतिनियुक्‍त करतात. याला त्या गावातील कृषी सहायकाने विरोध केल्यास निलंबनाची धमकी देत असल्याचाही आरोप आहे.

एटापल्ली हा दुर्गम आणि नक्षलप्रवण भाग आहे. या भागात कृषी विस्ताराचे काम कृषी सहायकांकडून होत असताना कृषी अधिकारी मुस्कुटदाबी करीत असल्याचे कृषी सहायकांचे म्हणणे आहे. यासोबतच अनेक गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले असून, याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...