agriculture news in marathi, server burn fails government online procurement process | Agrowon

तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर : नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदूर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा जळाल्याने राज्यात तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली आहे. सोमवारी (ता. १६) रात्रीपर्यंत ऑनलाइन यंत्रणा सुरू होईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, जर लवकर ‘सर्व्हर’ सुरू झाले नाही, तर राज्यात तूर व हरभरा खरेदीला अडचण निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नगर : नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदूर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा जळाल्याने राज्यात तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली आहे. सोमवारी (ता. १६) रात्रीपर्यंत ऑनलाइन यंत्रणा सुरू होईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, जर लवकर ‘सर्व्हर’ सुरू झाले नाही, तर राज्यात तूर व हरभरा खरेदीला अडचण निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांकडून हमी दराने तूर, हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेडने राज्यभर खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. यंदापासून शेतकऱ्यांनी तूर, हरभरा विक्री करण्याआधी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन नोंदणीचे काम ‘एनईएमएल’ (नॅशनल ई मार्केटिंग लि.) या खासगी संस्थेकडे दिलेले आहे. जानेवारीपासून तूर खरेदी सुरू असून, पंधरा दिवसांपासून हरभरा खरेदीसाठी केंद्रे सुरू केली आहेत. तूर विक्रीसाठी १८ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. केंद्रावर खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन काटा पावती दिली जाते. याशिवाय खरेदी केलेल्या मालाची ऑनलाइन एंट्री करून माल साठवणुकीसाठी गोडाउनला दिला जातो.

‘‘राज्यभरासाठी काम करणाऱ्या ऑनलाइन यंत्रणेचे मुख्य ‘सर्व्हर’ चांदूरमार्ग (मुंबई) येथे असून, तेथील कार्यालयाला सकाळी साडेअकराच्या दरम्यान आग लागली. आगीत जवळपास सगळीच ‘सर्व्हर’ यंत्रणा जळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील तूर, हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीसह खरेदी केंद्रावरील ऑनलाइन काटा पावती आणि लॉट एंट्रीचे काम कोलमडले आहे. ‘‘आग लागल्यामुळे यंत्रणा कोलमडली असून, त्याचा राज्यातील सगळ्या हरभरा, तूर खरेदीवर काहीसा परिणाम झाला आहे. ‘सर्व्हर’ यंत्रणा जळाली असली तरी सर्व ‘डाटा’ सुरक्षित आहे. बंद पडलेली यंत्रणा सुरू करण्याचे काम वेगात सुरू आहे. आज (सोमवारी) रात्रीपर्यंत पर्यायी व्यावस्थी सुरू होईल,’’ असे ‘एनईएमएल’च्या समन्वयकांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यामधील मार्केटिंग फेडरेशनलाही यंत्रणा कोलमडल्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आज (सोमवारी) यंत्रणा सुरू झाली नाही तर राज्यात तूर, हरभरा खरेदीवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मात्र सबंधित अधिकारी अधिक बोलायला तयार नाहीत. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...