agriculture news in marathi, server down of crop insurance, Maharashtra | Agrowon

पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांचा विमा काढण्याच्या मुदतीचे काउंटडाउन सुरू झालेले असतानाच ऑनलाइन पोर्टल मात्र ‘अंडर मेन्टेनन्स’ असा वारंवार संदेश देत असल्याने शेतकऱ्यांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे पीकविमा दाखल करण्यासाठी असलेली २४ जुलै ही अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांचा विमा काढण्याच्या मुदतीचे काउंटडाउन सुरू झालेले असतानाच ऑनलाइन पोर्टल मात्र ‘अंडर मेन्टेनन्स’ असा वारंवार संदेश देत असल्याने शेतकऱ्यांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे पीकविमा दाखल करण्यासाठी असलेली २४ जुलै ही अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा या योजनेचा प्रचार, प्रसार अधिक झाल्याने यावेळी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी नेहमीपेक्षा अधिक होत आहे. योजनेत सहभाग घ्यायचा असल्यास बिगर कर्जदारांना २४ जुलैपर्यंत, तर कर्जदारांना ३१ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मात्र हा विमा काढण्यासाठी जेव्हा शेतकरी ‘आपले सरकार सेवा’ केंद्रावर जातात, त्या वेळी हे पोर्टल सातत्याने ‘अंडर मेन्टेनन्स' असा संदेश देत असल्याची बाब घडत आहे. तर काहींचा अर्ज भरून झाल्यानंतर विम्याची रक्कम खात्यातून कपात होऊनही अर्जावर मात्र ‘अनपेड' असा संदेश देत असल्याचेही प्रकार होत आहेत.

अशा प्रकारे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच स्थिती राहिल्यास अनेक शेतकरी अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहू शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल केला तरच पात्र राहता येईल, असे कृषी आयुक्तालयाने आधीच जाहीर केल्यानेही एक प्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे.

खरीप हंगामातील पेरण्या बहुतांश भागात शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. शेतकरी त्यामुळे पीकविमा काढण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर जाताना दिसतात. या ठिकाणी सुरवातीच्या काळात अर्ज भरल्या गेले. आता मात्र जसजशी अंतिम मुदत जवळ यायला लागली, तसे हे सर्व्हर काम करीत नसल्याचे अनेक केंद्र चालकांनी सांगितले.

कर्जदार शेतकऱ्यांना तितकासा ताण नाही. ते ज्या बॅंकेकडून पीककर्ज घेत आहेत तेथेच ही रक्कम कपात होत आहे. मात्र बिगर कर्जदारांची अडचण झाली आहे. आधीच या हंगामात बॅंकांकडून पीककर्ज देताना मोठ्या प्रमाणात हात आखडता घेण्यात आलेला आहे. पीककर्ज वाटपाची गती संथ असल्याने प्रत्येक जिल्ह्यात प्रामुख्याने या भागात २५ टक्केही शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळालेले नाही. परिणामी पीककर्ज न मिळालेले सर्वच शेतकरी सध्या तरी बिगर कर्जदार आहेत. बिगर कर्जदारांची संख्या मोठी असून, पैशांची जुळवाजुळव करीत या शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी पुढाकार घेतला असताना तांत्रिक अडचणी डोकेदुखी वाढवीत आहे. बॅंकांनीसुद्धा बिगर कर्जदारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन केले जात असले, तरी बॅंका मात्र यासाठी तयार नाहीत.

सर्व्हर काम करीत नसल्याने अनेक ठिकाणी केंद्रचालक व शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होऊ लागले आहेत. तांत्रिक अडचणी सातत्याने येत असल्याने केंद्र चालकांनाही इतर कामे सोडून यातच वेळ घालवावा लागतो आहे. एकूणच अशा स्थितीत शासनाने ही सुविधा तातडीने सुधारणे गरजेचे आहे. तसेच पीकविमा भरणा न झालेल्यांची संख्या मोठी असल्याने मुदत वाढविण्याची गरज असल्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे.

येणाऱ्या अडचणी

  • सर्व्हर डाउन अंडर मेंटेनन्सचा मेसेज
  • अर्ज भरल्यावर पैसे खात्यातून कपात होते
  • अर्ज मात्र अनपेड दाखवणे 

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...