agriculture news in Marathi, Service for injured constable daughter in Agri department, Maharashtra | Agrowon

अतिरेकी हल्ल्यात जखमी पोलिसाच्या कन्येला कृषी खात्यात नोकरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव यांची कन्या धनश्री जाधव यांना राज्य सरकारने कृषी खात्यात नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले. राज्य सरकारने या संदर्भातील आदेश मंगळवारी (ता. २७) जारी केला आहे.

मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव यांची कन्या धनश्री जाधव यांना राज्य सरकारने कृषी खात्यात नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले. राज्य सरकारने या संदर्भातील आदेश मंगळवारी (ता. २७) जारी केला आहे.

‘‘माझ्या कन्येला नोकरी मिळावी म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. त्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून माझ्या शब्दाला मान दिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे,’’ असे अरुण जाधव यांनी सांगितले. धनश्री जाधव यांनी कृषी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांची कृषी खात्यात उपसंचालक या क्लास वन पदावर गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली. येत्या २ एप्रिल रोजी त्या कामावर रुजू होतील, असे जाधव म्हणाले. या नियुक्तीबद्दल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर हे तिघेजण अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी एका पोलिस व्हॅनमधून निघाले होते. त्यांच्यासोबत पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव हेसुद्धा होते, पण दुर्दैवाने अजमल कसाब व अबू इस्माईल या दोन्ही अतिरेक्यांनी वाहनावर केलेल्या गोळीबारात करकरे, कामटे व साळसकर हुतात्मा झाले. अरुण जाधव यांनाही पाच गोळ्या लागल्या होत्या. जाधव मृत झाल्याचे समजून अतिरेक्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही गाडी घेऊन अतिरेकी नरिमन पॉइंटच्या दिशेने पळाले, पण मध्येच गाडी बंद पडल्याने अतिरेक्यांनी ती रस्त्यातच सोडून दिली.

अतिरेकी तेथून निघून गेल्यानंतर जखमी अवस्थेत जाधव यांनी वायरलेस सेटवर माहिती दिली. अतिरेकी दुसरे एक वाहन घेऊन गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी वायरलेसद्वारे सांगितले होते. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर नाकेबंदी करून कसाब याला जिवंत पकडले. याप्रकरणी नेमलेल्या राम प्रधान समितीनेही जाधव यांचे कौतुक करून शौर्यपदक व पराक्रम पदकासाठी शिफारस केली होती. अतिरेकी हल्ल्यात जाधव यांना ४२ टक्के अपंगत्व आले आहे. जाधव यांना २९ वर्षे गुणवत्तेची पोलिस सेवा पूर्ण केल्याबद्दल मंगळवारीच राष्ट्रपती पोलिस पदकही मिळाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...