agriculture news in marathi, To set up cooperative societies of youth | Agrowon

युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार : देशमुख
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६० वर्षांवरील आहेत. देशाची भावी पिढी म्हणजेच युवक सहकारी संस्थांत आले पाहिजेत, यासाठी १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना सहकाराच्या प्रवाहात आणण्यात येईल. त्यासाठी शासनपातळीवर धोरण राबविण्यात येईल. त्या माध्यमातून युवकांच्या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी केली. 

कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६० वर्षांवरील आहेत. देशाची भावी पिढी म्हणजेच युवक सहकारी संस्थांत आले पाहिजेत, यासाठी १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना सहकाराच्या प्रवाहात आणण्यात येईल. त्यासाठी शासनपातळीवर धोरण राबविण्यात येईल. त्या माध्यमातून युवकांच्या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी केली. 

कऱ्हाड (जि. सातारा) येथील बापूजी साळुंखे महाविद्यालय आणि सहकार भारतीच्या वतीने आयाेजित ''ग्रामीण विकासात सहकाराचे योगदान'' या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अर्थतज्‍ज्ञ डाॅ. जे. एफ. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, ''''विद्यार्थ्यांना सहकाराचे धडे देण्याची गरज आहे. गावोगावच्या सहकारी सोसायट्या कर्ज देण्याशिवाय काहीच करत नव्हत्या. आज २ हजार २०० हून अधिक सोसायट्यांच्या माध्यमातून व्यवसायाची सुरवात करण्यात आली आहे. त्यातून संस्था आर्थिक सक्षम होत आहेत. साखर कारखान्यांसारखे अनेक रोजगार देणारे उद्योग उभे राहिले आहेत. सहकार मोडला तर ग्रामीण भाग मोडून पडेल.'

चरेगावकर, डाॅ. जे. एफ. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. पाटील यांनी महाविद्यालयीन युवकांची सहकारी संस्था स्थापन करण्याची कार्यवाही बापूजी साळुंखे महाविद्यालयामार्फत केली जाईल, त्यासाठी आपण परवानगी द्यावी, असे आवाहन केले.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...