agriculture news in marathi, Seven thousand farmers in the ninth green list of debt relief | Agrowon

कर्जमाफीच्या नवव्या ग्रीन लिस्टमध्ये सात हजार शेतकरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

परभणीः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची नववी ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे. या ग्रीन लिस्टनुसार ६ हजार ९९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ५५ कोटी ६० लाख २७ हजार ४६५ रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली. लवकरच ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

परभणीः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची नववी ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे. या ग्रीन लिस्टनुसार ६ हजार ९९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ५५ कोटी ६० लाख २७ हजार ४६५ रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली. लवकरच ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

आजवर प्राप्त १ ते ७ आणि नवव्या ग्रीन लिस्टनुसार जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकऱ्यांना ८०० कोटी ७७ लाख ३४ हजार ३९५ रुपयांची कर्जमाफी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्जमाफी योजनेअंतर्गत या आधी प्राप्त झालेल्या १ ते ७ ग्रीन लिस्टनुसार जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ५४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७४५ कोटी १७ लाख ६ हजार ९३० रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. बुधवारी (ता. २६) नववी ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे. त्यानुसार ६ हजार ९९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५५ कोटी ६० लाख २७ हजार ४६५ रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली आहे.

नवव्या ग्रीन लिस्टमधील सर्व शेतकरी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्ज खातेदार आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बॅंकेच्या ५ हजार ७८३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४९ कोटी २४ लाख २९ हजार ९९३ रुपये, अलाहाबाद बॅंकेचे २१६ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी २२ लाख ८९ हजार ३९० रुपये, बॅंक आॅफ बडोदाच्या ६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८२ लाख ६ हजार रुपये, बॅंक आॅफ महाराष्ट्राच्या ९१९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ कोटी ९३ लाख ४० हजार ५६२ रुपये, कॅनरा बॅंकेच्या १० शेतकऱ्यांच्या खात्यावर १० लाख ५६ हजार ७७२ रुपये, विजया बॅंकेच्या एका शेतकऱ्याच्या खात्यावर ८४ हजार ७४८ रुपये जमा करण्यात येतील. अद्याप आठवी ग्रीन लिस्ट मात्र प्राप्त झालेली नाही. आजवर प्राप्त झालेल्या १ ते ७ आणि ९ व्या ग्रीन लिस्टनुसार जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकऱ्यांना ८०० कोटी ७७ लाख ३४ हजार ३९५ रुपये एवढी कर्जमाफी मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...