agriculture news in marathi, Seven thousand works will be done through Jalyukt | Agrowon

‘जलयुक्त’मधून होणार सात हजार कामे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नगर ः जलयुक्त शिवार अभियानासाठी नगर जिल्ह्यामधून यंदा २०१८-१९ या वर्षामध्ये २४९ गावांत ७ हजार ८७ कामे होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा समितीने २४८ कोटी २८ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आठ दिवसांत प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जास्तीत जास्त कामे व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

नगर ः जलयुक्त शिवार अभियानासाठी नगर जिल्ह्यामधून यंदा २०१८-१९ या वर्षामध्ये २४९ गावांत ७ हजार ८७ कामे होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा समितीने २४८ कोटी २८ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आठ दिवसांत प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जास्तीत जास्त कामे व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्याने गेल्या दहा वर्षांत नगर जिल्ह्याने अनेक दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. मध्यंतरी दोन वर्षे तर अगदी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी भटंकती करावी लागली. केवळ पाणीपुरवठ्यावर प्रशासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. टंचाईमुळे शेतीही पूर्णतः धोक्‍यात आली. हीच स्थिती कमी-जास्त प्रमाणात राज्यभर होती.

दुष्काळावर मात करण्यासह शेतीला शाश्‍वत पाणी उपलब्ध व्हावे, राज्यातील टंचाई संपूर्णपणे दूर होऊन राज्य टॅंकरमुक्त व्हावे, यासाठी २०१५-१६ पासून कृषी विभागासह अन्य विविध योजनांचा ताळमेळ घालत ‘जलयुक्त शिवार अभियान’ सुरू केले. पाच वर्षे सलग टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासह दुष्काळी स्थिती, सिंचनाचा अभाव, अशा काही निकषांवर जलयुक्त शिवार अभियानासाठी गावांची निवड केली.

पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६८, तिसऱ्या वर्षी २४१ गावे निवडली. या तीन वर्षांत जलयुक्तवर सुमारे तीनशे कोटींपेक्षा जास्ती खर्च झाला आणि सुमारे पंचवीस हजारांपेक्षा अधिक कामे मार्गी लागली. यंदा चौथे वर्ष असून, निकषानुसार २४९ गावांची निवड केलेली आहे. यंदा निवडलेल्या गावांत आत्तापर्यंत अभियानात ७८८ गावे झाली असून, आता जिल्ह्यातील सर्व गावे संपली आहेत.

यावर्षीच्या २४९ गावांत कामे करण्यासाठी जिल्हा समितीने २४८ कोटी २८ लाख रुपये किमतीचे ७ हजार ८७ कामे निश्‍चित केली आहे. आराखड्याला समितीने मंजुरी दिलेली आहे. आठ दिवसांत सबंधित कामाचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी सांगितले.

प्रलंबित कामे पूर्ण करा
जलयुक्त शिवार अभियानात गतवर्षी निवडलेल्या २४१ गावांतील कामे अजूनही काही प्रमाणात प्रलंबित आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सोमवारी (ता. २७) सूचना दिल्या आहेत. दोन-तीन वर्षांत झालेल्या कामाचा फायदा
झाल्याचे नमूद केले आहे. यंदा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या कामांनाही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आराखड्याची स्थिती
एकूण गावे ः २४९
मंजूर कामे पूर्ण करणे ः ६१
नव्याने घ्यावयाची कामे ः ४८७८
दुरुस्ती व बळकटीकरणाची कामे ः २१४८
एकूण रक्कम ः २४८ कोटी २८ लाख

इतर बातम्या
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
सातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प...जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव...
नाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे...नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा...
तंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः...औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे...
प्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे...जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या...
हिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना...हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान...
परभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप...
म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली...सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...