राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी थकविली

काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडी
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडी

पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. मात्र, दहा कारखान्यांनी पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, की ३१ डिसेंबरपर्यंत ७ हजार ४५० कोटी रुपये एफआरपीपोटी शेतकऱ्यांना देय होते. त्यातील ३९ टक्के म्हणजेच दोन हजार ८७४ कोटी रुपये देण्यात आले. साखर कारखान्यांचे गाळप आतापर्यंत ४९७ लाख टनांपर्यंत पोचले आहे. त्यातून ५२९ लाख क्विंटल साखर तयार झाली असून, उतारा १०.६४ टक्के मिळाला आहे.

“थकीत पेमेंटच्या मूल्यापोटी शेतकऱ्यांना साखर विकण्यात कारखान्यांना कायदेशीर काहीही अडचण नाही. प्रश्न केवळ पाच टक्के जीएसटीचा येतो. १४५ रुपये जीएसटी शेतकऱ्यांवर येणार नाही,’’ अशी भूमिका खासदार   राजू शेट्टी यांनी घेतली आहे, असेही ते म्हणाले.

कारखान्यांनी कायद्याप्रमाणे एकरकमी एफआरपी द्यावी, असा आग्रह आमचा राहील. साखर शेतकऱ्यांना देण्याबाबत आम्ही कोणतीही सक्ती कारखान्यांना करणार नाही. कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना साखर देण्यास मुळात कारखान्यांना अडचण नाही. या संकल्पनेबाबत काही कारखानेदेखील सकारात्मक आहेत, असेही साखर आयुक्तांनी सांगितले.

थकीत उसाचे पेमेंट करण्याबाबत साखर कारखान्यांनी अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढण्याबाबत शासन दरबारी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. तोडगा निघेपर्यंत कारखान्याकडे उपलब्ध रकमेतून आधी छोट्या शेतकऱ्यांचे पेमेंट करण्यास प्राधान्य देता येईल का, याचीदेखील चाचपणी केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

या कारखान्यांनी दिली एफआरपी ज्ञानेश्वर, मुळा, संगमनेर, संजीवनी, कोपरगाव (नगर), वसंतदादा, द्वारकाधीश (नाशिक), आदिनाथ, पुष्पदंतेश्वर (नंदुरबार), सातपुडा (चोपडा) या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली आहे. ८० टक्क्यांपर्यंत २५ कारखान्यांनी पेमेंट केले असून, ७४ कारखान्यांनी थोडेदेखील पेमेंट केलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com