agriculture news in marathi, sewage water can fill three Dams! | Agrowon

सांडपाण्याने भरतील तीन धरणे !
योगीराज प्रभुणे
शनिवार, 12 मे 2018

पुणे : लोकसंख्या वाढली... औद्योगीकरण वाढले... पाण्याची मागणी वाढली... पण वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा काही सक्षमरीत्या उभी राहू शकलेली नाही. परिणामी, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे काठोकाठ भरतील, इतके सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता आपण दरवर्षी थेट नद्यांमध्ये सोडत आहोत. यातील 85.85 टक्के सांडपाणी तयार होणाऱ्या राज्यातील 27 महापालिकांपैकी केवळ 15 ठिकाणीच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. 

पुणे : लोकसंख्या वाढली... औद्योगीकरण वाढले... पाण्याची मागणी वाढली... पण वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा काही सक्षमरीत्या उभी राहू शकलेली नाही. परिणामी, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे काठोकाठ भरतील, इतके सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता आपण दरवर्षी थेट नद्यांमध्ये सोडत आहोत. यातील 85.85 टक्के सांडपाणी तयार होणाऱ्या राज्यातील 27 महापालिकांपैकी केवळ 15 ठिकाणीच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. 

राज्यातून वाहणाऱ्या प्रमुख 49 नद्यांमध्ये 156 ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यापैकी 153 ठिकाणी नद्यांच्या पाण्यातील "बायोकेमिकल ऑक्‍सिजन डिमांड' प्रतिलिटर पाण्यात तीन मिलि ग्रॅमपेक्षा जास्त होती. 

सर्वाधिक वाहते सांडपाणी! 
देशात रोज तयार होणाऱ्या 61,754 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी एकट्या महाराष्ट्रातूनच 7,297 दशलक्ष लिटर (देशाच्या 11 टक्के) सांडपाणी तयार होते. त्यापैकी 5,160 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उरलेले जवळपास 27.5 टीएमसी सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. 

वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा गेल्या 30 वर्षांमध्ये प्रभावीपणे उभी राहिली नाही, हे नदी प्रदूषणाचे मूळ आहे. यासाठी आता सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची केंद्रे उभारण्यावर भर दिला जात आहे. 
- आर. एम. भारद्वाज, जल गुणवत्ता व्यवस्थापक, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली. 

महापालिकांच्या अर्थसंकल्पातील 25 टक्के निधी सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातून उभ्या राहिलेल्या निधीतून ही केंद्रे उभी करता येतील, यावर आता भर दिला जात आहे. 
- यशवंत सोनटक्के, सहसंचालक (जल), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

सांडपाण्यात सर्वाधिक वाटा महापालिकांचा 
संस्था .......................सांडपाणी सोडण्याचे प्रमाण (सर्व आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
महापालिका ........................... 85.62 
नगर परिषद ( वर्ग 1) ............ 2.59 
नगर परिषद ( वर्ग 2) ............. 5.04 
नगर परिषद ( वर्ग 3) ............. 6 
कॅंटोन्मेंट बोर्ड ....................... 0.54 
नगर पंचायत ......................... 0.21 
(स्रोत ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...