agriculture news in marathi, shadow of drought on festival, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पोळा सणावर दुष्काळाचे सावट
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

नगर   : जिल्ह्यात पावसाळ्यातील तीन महिन्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. खरिपाची पिके जवळपास वाया गेलेली असून रब्बीही हंगामाचीही शाश्‍वती नाही. त्यामुळे सर्वच भागात बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट असल्याची स्थिती आहे. ग्रामीण भागातील आठवडे बाजारात सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली होती. मात्र सजावट साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांचा फारसा उत्साह नव्हता.

नगर   : जिल्ह्यात पावसाळ्यातील तीन महिन्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. खरिपाची पिके जवळपास वाया गेलेली असून रब्बीही हंगामाचीही शाश्‍वती नाही. त्यामुळे सर्वच भागात बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट असल्याची स्थिती आहे. ग्रामीण भागातील आठवडे बाजारात सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली होती. मात्र सजावट साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांचा फारसा उत्साह नव्हता.

शेतकऱ्यांसाठी बैलपोळा महत्त्वाचा सण आहे. नैसर्गिक परिस्थिती चांगली असली अथवा दुष्काळी परिस्थिती असली तरी हा सण शेतकरी साजरा करतातच; मात्र गेल्या दोन वर्षांच्या चांगल्या परिस्थितीनंतर यंदा मात्र या सणावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाळा सुरू होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे भरले, मुळा धरणात पाणी आले असले तरी अन्य भागात मात्र पाऊस नाही.

खरिपाची जवळपास साडेतीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिके वाया गेल्यात जमा आहेत. कापसावर यंदाही बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याने कापसाचे उत्पादन घटणार हे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता जवळपास ५० ते ६० टक्के उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याने ऊस उत्पादकही संकटात आले आहेत. दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जात असले तरी पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. दुधालाही अजून पुरेसा दर नाही. रब्बीत पेरण्या होतीलच; पिके चांगले येतील याची अजिबात शाश्‍वती नाही. या साऱ्या बाबींचा आजच्या पोळा सणावर परिणाम झाला आहे.

बैलपोळा सणाच्या खरेदीवरही त्याचा परिणाम झाला आहे. आठवडे बाजारात शेतकरी अत्यंत माफत प्रमाणात जुजबी साहित्य खरेदी करताना दिसून आले. बाशिंग, झूल, गोंडे, घुंगरमाळा, मोरखी, रंग, हिंगुळ, कासरा, घोगर, घाटी अशा विविध सजावटीच्या साहित्याची खरेदी करताना उत्साह दिसत नव्हता.
 
बैलांना अंघोळ घालायची कोठे?
पाऊस नसल्याने नदी, ओढा, गाव तलाव, पाझर तलावात कोठेही पाणी साठलेले नाही. दुष्काळी असलेल्या जामखेड, पाथर्डी, पारनेर, संगमनेरचा पठार भाग, नेवासा, शेवगाव तालुुक्‍यांत पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे पोळा सणाच्या दिवशी बैलांना अंघोळ कुठे घालायची असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...