agriculture news in marathi, shadow of drought on solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे संकट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच पावसाने सतत हुलकावणी दिली. आज साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटत आला, पण अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरी, बोअर, तलाव यांसारख्या कोणत्याही स्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील ११ पैकी १० तालुक्‍यांमध्ये ४५ टक्‍क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असताना, आता ‘हुमणी’ने धुमाकूळ घातल्याने ऊसपट्ट्यातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकूणच जिल्ह्यावर या दोन्ही आपत्तींमुळे दुहेरी संकट ओढावले आहे.

सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच पावसाने सतत हुलकावणी दिली. आज साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटत आला, पण अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरी, बोअर, तलाव यांसारख्या कोणत्याही स्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील ११ पैकी १० तालुक्‍यांमध्ये ४५ टक्‍क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असताना, आता ‘हुमणी’ने धुमाकूळ घातल्याने ऊसपट्ट्यातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकूणच जिल्ह्यावर या दोन्ही आपत्तींमुळे दुहेरी संकट ओढावले आहे.

सोलापूर जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असला, तरी खरिपातही बऱ्यापैकी पिके घेतली जातात. गेल्या तीन वर्षांपासून खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आली आहे. ९८ हजार हेक्‍टर पेरणीचे उद्दिष्ट असलेल्या या हंगामात आता अडीच ते तीन लाख हेक्‍टर क्षेत्रापर्यंत पेरणीचे क्षेत्र पोचले आहे. यंदाही जवळपास दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेषतः तूर, सोयाबीन, मूग, मटकी, उडीद या पिकांचा त्यात समावेश होतो. आता मूग, मटकी, उडीद पावसाअभावी वाया गेले आहे. आता सोयाबीन आणि तूर फक्त शिवारात आहे. पण तेही आता करपून चालले आहे.

सोलापूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०० मिमी आहे. या महिन्यात आतापर्यंत ४१६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत फक्त सरासरी १७०.९८ मिमी पाऊस झाला आहे. अवघ्या ४०.६५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या भागात सर्वाधिक परिस्थिती कठीण झाली आहे.

एकीकडे दुष्काळाची ही परिस्थिती असताना, पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, बार्शी आदी भागांत उसावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील शेतकरी वेगळ्याच संकटात अडकले आहेत. जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्‍टर इतके उसाचे क्षेत्र आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यापैकी जवळपास २५ हजार हेक्‍टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येते. कृषी विभागाकडून सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

उजनी भरले तरीही...
पुण्याच्या पाण्यावर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले असले, तरी या धरणाचा फायदा माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा, मोहोळ या मोजक्‍याच तालुक्‍यांना होतो. उर्वरित तालुक्‍यांत पाण्यासाठी वणवण अजूनही कायम आहे. त्यात आता दुष्काळामुळे तर फारच अडचण झाली आहे. त्यामुळे धरण भरलेले असूनही या पाण्याचा उपयोग सरसकट जिल्ह्याला होत नाही.
 
प्रशासनाच्या हालचाली

  • जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव
  • जिल्ह्याच्या ४० टक्के भागात पाणीटंचाई शक्‍यता
  • ऑक्‍टोबर ते डिसेंबरपर्यंतचा टंचाई आराखडा होणार तयार
  • टॅंकर ऐवजी विहीर, बोअर अधिग्रहणावर भर
  • पूरक पाणीपुरवठा योजनांचेही करणार अधिग्रहण    
  • दीड कोटीचा आराखडा तयार होण्याची शक्‍यता

 

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...