कोल्हापुरात आज शाही दसरा

कोल्हापूर शाही दसरा
कोल्हापूर शाही दसरा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेला कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा शनिवारी (ता. ३०) होत आहे. कोल्हापूरचा दसरा उत्सव हा राजेशाही पद्धतीचा असल्याने सुरवातीपासूनच याला शाही दसरा असे संबोधले जाते.

खचाखच भरलेले दसरा मदान, बंदुकीच्या फैरींनी दुमदुमणारा आसमंत, पारंपरिक पोशाखात असलेले मानकरी, महाराजांच्या ऐतिहासिक गाडीतून होणारे छत्रपती परिवाराचे आगमन अशा शाही थाटात करवीरनगरीचा शाही दसरा प्रतिवर्षी पार पडतो. म्हैसूरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा साऱ्या देशात प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक मेबॅक गाडीतून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या परिवारासमवेत शिलंगणाच्या सोहळ्यासाठी दसरा मदावर आल्यानंतर सर्वजण उभे राहून त्यांना मानवंदना देतात. महाराजांच्या समवेत परिवारजन असतात. श्रीमंत शाहू महाराजांनी शमीच्या पानांचे पूजन करताच बंदुकीच्या फैरी उडवण्यात येतात.

नागरिकही सोने लुटण्यासाठी आणि महाराजांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. यानंतर अंबाबाईची पालखी पंचगंगा नदीवर पोचताच मानकऱ्यांची ललकारी दिली जाते. नदीवरून पालखी पुन्हा मंदिरामध्ये आल्यानंतर सोहळ्याची सांगता होते. महोत्सवाची तयारी झाली असून दसरा चौक या सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com