agriculture news in marathi, The Shahu team's initiative to unify the jugglers | Agrowon

गूळ उद्योजकांना एकत्र करण्यासाठी शाहू संघाचा पुढाकार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर : राज्यातील गूळ उद्योजकांना एकत्र करून गूळ उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाने पुढाकार घेतला आहे. विविध समस्या सोडविण्यासाठी एकत्रित ताकद उभी राहावी, यासाठी गूळ उद्योगातील व्यावसायिक, गूळ उत्पादक यांनी संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूर : राज्यातील गूळ उद्योजकांना एकत्र करून गूळ उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाने पुढाकार घेतला आहे. विविध समस्या सोडविण्यासाठी एकत्रित ताकद उभी राहावी, यासाठी गूळ उद्योगातील व्यावसायिक, गूळ उत्पादक यांनी संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी केले आहे.

स्वातंत्र्यापूर्वीपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारा उद्योग दुर्लक्षित राहिला आहे. संशोधनाचा अभाव, एकी व दराची अनिश्‍चितता अशा स्थितीमुळे हा उद्योग संकटात आला आहे. या उद्योगासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अन्न प्रक्रिया विभागाच्या अनेक योजना आहेत; पण उद्योजक एकत्र नसल्याने याचा कोणताही फायदा कोणत्याच घटकाला होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. पारंपरिक जोखडात अडकलेल्या गूळ

उद्योजकाला एकत्रित झाल्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणे अशक्‍य आहे. यासाठीच आमची संस्था या उद्योगातील विविध घटकांचे एकत्रीकरण करत आहे.
सध्या गुऱ्हाळ चालविणारे, गुऱ्हाळ सुरू करण्यास इच्छुक शेतकरी, विविध कारणांनी गुऱ्हाळे बंद केलेले उद्योजक आदीसह गूळ निर्मिती व विक्रीच्या क्षेत्रात जे जे घटक आहेत. त्या सर्वांना एकत्र करून गूळ उद्योजकाला चांगले दिवस आणण्यासाठी संस्था या सर्वांची माहिती एकत्रित करीत आहे. राज्यातील उद्योजकांनी संस्थेकडे आपली नोंदणी करावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...