सोलापूरजिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदी शैलेश कोतमिरे

जिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदी शैलेश कोतमिरे यांची नेमणूक
जिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदी शैलेश कोतमिरे यांची नेमणूक

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्याकडे प्रशासकपद देण्यात आले होते; पण देशमुख यांनी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण देऊन या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता साखर संचालक (पुणे) शैलेश कोतमिरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कोतमिरे यांनी शुक्रवारी (ता. २८) प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

कर्जाच्या थकबाकीमुळे जिल्हा बॅंक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारशीनंतर जिल्हा बॅंक बरखास्तीचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हा बॅंकेची बरखास्ती झाली आणि त्यावर प्रशासक म्हणून देशमुख यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी पदभार घेतल्यानंतर कर्जवसुलीसाठी चांगले प्रयत्न केले. कर्जवाटपही बऱ्यापैकी सुरू होते; पण अचानकपणे देशमुख यांनी आपल्याला जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा बॅंक प्रशासक हे दोन्ही पदभार सांभाळताना कसरत करावी लागत आहे. पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण देत राजीनामा दिला आहे.

कोतमिरे यांनी पदभार सांभाळताना तातडीने बॅंकेच्या प्रशासकीय विभागाची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. ठेवी वाढवणे आणि कर्जवसुलीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com