agriculture news in Marathi, Shankaranna Dhondge says false promise for compensation of bowl worm affected farmers, Maharashtra | Agrowon

बोंड अळीग्रस्तांना मदतीची घोषणा फसवी ः शंकरअण्णा धोंडगे
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

लोहा, जि. नांदेड  : राज्यातील फडणवीस सरकारकडून बोगस घोषणांचा वर्षाव सुरू असून, फसव्या कर्जमाफीचा पुरता बट्ट्याबोळ झाला. आता बोंड अळी नुकसानीची फसवी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. मोठ्या घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची, असा प्रकार सध्या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप शेतकरी नेते तथा माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी केला आहे.

लोहा, जि. नांदेड  : राज्यातील फडणवीस सरकारकडून बोगस घोषणांचा वर्षाव सुरू असून, फसव्या कर्जमाफीचा पुरता बट्ट्याबोळ झाला. आता बोंड अळी नुकसानीची फसवी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. मोठ्या घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची, असा प्रकार सध्या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप शेतकरी नेते तथा माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी केला आहे.

२० जानेवारी रोजी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मेळावा लोहा येथे होत आहे. यासंदर्भात माहीती देण्यासाठी शुक्रवारी (ता. १३) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. धोंडगे म्हणाले, की सरकारने कर्जमाफीची घोषणा मोठा गाजावाजा करून केली. मात्र त्याचे पुढे काय झाले सर्वांना माहीत आहे. बोंड अळीमुळे नुकसान झाले सुरवातीला तर ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे मान्य करायलाच सरकार तयार नव्हते. ज्या वेळी आम्ही युक्तिवाद केला. त्यामुळे सरकारने बोंड अळी नुकसान मदत हेक्‍टरी ३० हजार रुपये जाहीर केली. मात्र यामध्ये सरकार बीटी कंपनीकडून नुकसानभरपाई म्हणून ९ हजार कोटी, केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण विभागाकडून ४ हजार कोटी व उर्वरित रक्कम पीकविमा कंपनीकडून घेणार असल्याचे सांगितले.

बीटी कंपनीने बियाण्यांच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी सरकारची आहे आमची नाही, असे  म्हणून नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. केंद्र सरकारने अलीकडे आपत्ती व दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचीही मदत मिळण्याची शक्‍यता नाही. तर महाराष्ट्रात कापूस पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नगण्यच आहे. यामुळे हीसुद्धा मदत शेचकऱ्यांना होणे शक्‍य नाही. त्यामुळे ही घोषणाही फसवीच ठरणार आहे. तूर, सोयाबीन, भात, दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदानही सरकारने दिले नाही. या सरकारच्या काळात शेती सिंचनासाठी उपयुक्त सिंचन प्रकल्पही रखडले आहेत. 

या सर्व प्रकारच्या सरकारच्या निष्क्रियतेविरोधात २० जानेवारी रोजी लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत हल्लाबोल मेळावा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी दत्ता पवार, संजय कऱ्हाळे, डॉ. सुनील धोंडगे, संतोष केंद्रे, शिवराज पवार, प्रल्हाद फाजगे, बंटी सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...