agriculture news in marathi, Sharad Pawar appeals his party worker not to stop now | Agrowon

...यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई : फक्त लोकांच्या भावनेला हात घालायचा. प्रत्यक्षात काही करायचे नाही, लोकांची फसवणूक करायची. यातून लोकांना वाचवायचे असेल तर हल्लाबोल थांबवायचा नाही, आता यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.२८) व्यक्त केला.

मुंबई : फक्त लोकांच्या भावनेला हात घालायचा. प्रत्यक्षात काही करायचे नाही, लोकांची फसवणूक करायची. यातून लोकांना वाचवायचे असेल तर हल्लाबोल थांबवायचा नाही, आता यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.२८) व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने येथील आझाद मैदानात आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते. या वेळी श्री. पवार पुढे म्हणाले, यंदा देशात धान्य उत्पादनासाठी विक्रमी कार्यक्रम राबवला जात आहे. मात्र, रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका दिला जात आहे. अनेक देशांत मका जनावरांसाठी दिला जातो, आणि या सरकारने सामान्य जनतेच्या आरोग्याला धक्का देण्यास सुरवात केली आहे. उत्पादन जास्त होऊनही ही स्थिती आहे. ना खाऊंगा ना खाणे दूॅंगा असे हा गडी सांगत होता. पण याच मुंबई शहरातून नीरव मोदी ११ हजार कोटी रुपये लुटून पळाला.

सरकारने जी उद्योग विषयक धोरणे बदलली आहेत, त्यामुळे देशात लहान उद्योग बंद पडणार आहेत आणि बेरोजगारी वाढणार आहे. एखादा उद्योजक किंवा तरुण संकटात आला तर त्याचे पुनर्वसन करायचे धोरण, कायदे या सरकारने रद्द केले आहेत. महागाई शिगेला पोचली आहे, सुरू असलेले कारखाने बंद होत आहेत. रोजगार कमी होत आहेत. नवीन रोजगार मिळत नाहीत. समाजातील खालच्या वर्गावर अन्याय होत आहे. अच्छे दिनची घोषणा केली होती, मात्र आता लोक म्हणत आहेत, आम्हाला आमचे जुने दिवस द्या आणि आमची सुटका करा. पण हे काय सुटका करणार नाहीत, त्यामुळे आता आपणच त्यांच्याकडून सुटका करून घ्यायची आहे.

राज्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून झालेले नाही. आंबेडकर स्मारकाबाबतही काही केले नाही. फक्त लोकांच्या भावनेला हात घालायचा. प्रत्यक्षात काही करायचे नाही, लोकांची फसवणूक करायची. यातून लोकांना वाचवायचे असेल तर हल्लाबोल थांबवायचा नाही, आता यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही असा निर्धारही पवार यांनी या वेळी बोलून दाखवला. हल्लाबोल यात्रा पूर्ण राज्यात फिरली आता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हल्लाबोल यात्रा बाकी आहे. येथील लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आ़णि त्यांना आधार देण्यासाठी अधिवेशन संपले की त्या भागात हल्लाबोल यात्रा काढली जाईल, असेही श्री. पवार या वेळी म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...