Agriculture News in Marathi, Sharad pawar comments on farmer suicides, Satara | Agrowon

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने धोरणे आखावीत ः पवार
विकास जाधव
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017
सातारा ः शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने सरकारने धोरणे आखावीत, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला अाहे.
 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे कशी जगवायची, याचा विचार करावा लागेल. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील ज्ञानसंपदेचा मार्ग सुरू राहावा यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मुले इथे आणली अाहेत. या उपक्रमातून ही उपेक्षित मुले आम्ही शिकवून त्यांना उभे करणार अाहोत, असे त्यांनी सांगितले.
 
सातारा ः शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने सरकारने धोरणे आखावीत, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला अाहे.
 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे कशी जगवायची, याचा विचार करावा लागेल. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील ज्ञानसंपदेचा मार्ग सुरू राहावा यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मुले इथे आणली अाहेत. या उपक्रमातून ही उपेक्षित मुले आम्ही शिकवून त्यांना उभे करणार अाहोत, असे त्यांनी सांगितले.
 
सातारा येथे बुधवारी (ता.४) रयत शिक्षण संस्थेच्या ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलपती आमदार पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य दिलीप वळसे पाटील, बाळाराम पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधणे, बबनराव पाचपुते, दादाभाऊ कळमकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, ॲड. भगीरथ शिंदे, डॉ. भाऊसाहेब कराळे, फरोख कुपर, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
 
श्री. पवार म्हणाले, की आत्महत्या करण्याचे मुख्य कारण कर्जबाजारीपणा हे आहे. आम्ही सत्तेत असताना या दृष्टीने काही निर्णय घेतले होते. तीन लाखांपर्यंत पीककर्जाचे व्याज १२ टक्क्यांचे तीन टक्क्यांवर आणले होते; तसेच त्या वेळच्या राज्य सरकारने वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याची महत्त्वाची कामगिरी केली.
 
शेतकऱ्यांची निराशा कमी करण्यासाठी आम्ही पावले टाकली असतानासुद्धा काही शेतकरी आत्महत्या करतात; यामुळे कुटुंबे उघडी पडतात. या कुटुंबांतील ज्ञानसंपदेचा मार्ग हा सुरू राहिला पाहिजे. यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या मुलांची जबाबदारी घेण्याचा संस्थेत ठराव घेतला.
 
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरवातीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना याच पद्धतीने शिक्षणात आणले. संस्थेच्या या उपक्रमातून ही मुले आम्ही शिकवून त्यांना उभे केल्याशिवाय शांत राहणार नाही. पुढील काळात ही मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत मोठी झालेली पाहावयास मिळतील, अशी अाशा त्यांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...