agriculture news in marathi, Sharad Pawar critises Uddhav thackreys stand | Agrowon

शेतकरीहिताचा विचार होत नसताना सत्तेत कशासाठी
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड, जि. सातारा : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होत नसेल, तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तीन वर्षांत तर शेतकऱ्यांच्या हिताचा काहीच विचार झाला नाही. त्यांचा पाय फेव्हिकाॅलसारखा सत्तेत चिकटलेला असून, तो त्यातून बाहेरच निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित होत नाही, हे जगजाहीर असताना मग कशासाठी ते सत्तेत आहेत, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे उपस्थित केला. 

कऱ्हाड, जि. सातारा : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होत नसेल, तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तीन वर्षांत तर शेतकऱ्यांच्या हिताचा काहीच विचार झाला नाही. त्यांचा पाय फेव्हिकाॅलसारखा सत्तेत चिकटलेला असून, तो त्यातून बाहेरच निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित होत नाही, हे जगजाहीर असताना मग कशासाठी ते सत्तेत आहेत, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे उपस्थित केला. 

उद्धव ठाकरे सत्तेत असूनही सरकारविरोधात बोलतात याबाबत सत्तेच जायचे आणि सत्तेला लाथा घालायच्या, हे आपण यापूर्वी पाहिले नाही. सत्तेत जाऊन, सत्तेचा पूर्ण लाभ घेऊन सत्तेच्या नावाने शंख कसा करायचा, याची एक नवी दिशा त्यांनी दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी मारला. 
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी श्री. पवार शनिवारी (ता. २५) कऱ्हाड येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोल्हापुरात केलेल्या पवारसाहेब नेहमी ‘ध’ चा ‘मा’ करतात या विधानाबद्दल ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होत नसेल, तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे त्यांनी म्हटले होते. तीन वर्षांत तर शेतकऱ्यांचा हिताचा काहीच विचार झाला नाही आणि यांचा पाय फेव्हिकाॅलसारखा सत्तेत चिकटलेला असून, तो त्यातून बाहेरच निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित होत नाही हे जगजाहीर असताना मग कशासाठी ते सत्तेत आहेत? आमच्या मित्रांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे मी फार काय बोलत नाही.

उद्धव ठाकरे सत्तेत असूनही सरकार विरोधात बोलतात, टीका करतात यावर श्री. पवार म्हणाले, सत्तेच जायचे आणि सत्तेला लाथा घालायच्या, हे आपण यापूर्वी पाहिलेले नाही. सत्तेत जाऊन, सत्तेचा पूर्ण लाभ घेऊन सत्तेच्या नावाने शंख कसा करायचा याची एक त्यांनी दिशा दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी या वेळी मारला. 

देशमुखांचा लौकीक 
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पवारसाहेब व उद्धव ठाकरे यांचा कर्जमाफीला विरोध होता, असे वक्तव्य केले होते त्याबद्दल ते म्हणाले, देशमुख यांचे या विषयातील ज्ञान आपण दोन वर्षे बघतोय. त्यांच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. काही विधाने करण्याचा लौकीक ज्यांचा आहे त्यामध्ये देशमुखांचे नाव वरच्या पातळीवर आहे. कर्जमाफीच्यासंदर्भात आमची काय मते आहेत, ती आम्ही सरकारला सांगितली आहेत. 

सरकारकडून फसवणूक, गंभीर बाब
कर्जमाफीतील रकमेपैकी शेतकऱ्यांना दमडीही मिळालेली नाही, असे सांगून श्री. पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी एवढी रक्कम खात्यावर भरली असे सांगितले; मात्र ती शेतकऱ्यांना का मिळाली नाही. मध्यंतरी बॅंकाच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी दोन प्रकारची कर्जे आहेत, असे सांगितले. दोन प्रकारची कर्जे आहेत. पीक कर्ज राज्य सरकार भरणार आहे ते अजून भरलेले नाही. दुसरे दीर्घ मुदतीचे कर्ज वाढवण्यासाठी बॅंकांनी राज्य सरकारला हप्ते द्यावेत, असे सांगितले आहे. शेतकऱ्यांना पैसे भरण्याची एेपत असती, तर त्यांनी कर्जच काढले नसते. राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने फसवणूक ही गंभीर बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. 

लाभ नाही; मात्र दिल्याचा दावा 
सरकारने मी लाभार्थी अशा जाहिराती केल्या आहेत यावर ते म्हणाले, त्या जाहिराती निट बघितल्यावर सरकारने जाहिरातीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला, असे सांगितले आहे. अजून योजना राबवायची आहे तरीही दिला म्हटले आहे. शेवटी ४० हजार कोटी एवढी रक्कम माफ केली, असे जाहीर केले आहे. अजून दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही; मात्र मीडियात मंदी आहे. त्यांचा तरी लाभ केला आहे, याचे कौतुक आहे, असा टोला त्यांनी मारला. 

रस्त्यांची अवस्था भयावह 
रस्त्यांची दुरवस्था झाली असून, सुप्रिया सुळे सेल्फी काढताहेत त्यासंदर्भात ते म्हणाले, तीन वर्षांत ज्या दर्जाचे रस्त्यांचे काम होत आहे तो दर्जा महिना-पंधरा दिवसही टिकत नाही. पंधरा वर्षांत कुठे खड्ड्यांचे फोटो आलेत, लोकांनी मोहीम घेतली. चंद्रकांतदादांनी त्यासंदर्भात कुठे कार्यक्रम हाती घेतला नाही, असे चित्र आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था भयावह आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...