agriculture news in marathi, Sharad Pawar demands for 50 percent more price on crop production cost, Amaravati, Maharashtra | Agrowon

शेतमालास उत्पादन खर्चापेक्षा अधिक ५० टक्के भाव हवा
ज्ञानेश उगले
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

अमरावती : कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधीच सुटणार नाहीत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्‍के रक्‍कम असा शेतमालाच्या विक्रीपोटी परतावा मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी नांदेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. 

अमरावती : कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधीच सुटणार नाहीत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्‍के रक्‍कम असा शेतमालाच्या विक्रीपोटी परतावा मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी नांदेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. 

सोमवारी (ता.२३) श्री. पवार यांचा अमरावती शहरात सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी; तर पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी मंत्री अनिल देशमुख, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अनिल बोंडे उपस्थित होते. 

श्री. पवार यांनी आपल्या भाषणात अमरावतीशी असलेल्या ऋणानुबंधाचा विशेष उल्लेख केला. राजकीय कारकिर्दीची सुरवात करताना अमरावतीशी अनेकदा संपर्क आला. या वेळी अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या नावांचाही त्यांनी उल्लेख केला. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेवटच्या घटकातील मुलांच्या शिक्षणाचा विचार करून शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. त्यांच्यामुळेच आज अमरावती शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावारूपास आले.

शेतीची उत्पादकता वाढवायची असल्यास शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व निविष्ठांची उपलब्धता कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या मार्गाने आजच्या सरकारने जाण्याची गरज आहे. उत्पन्न वाढत नाही तोवर शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणे शक्‍य नाही. त्याकरिता कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व त्यावर अधिक ५० टक्‍के याप्रमाणे पैसे मिळण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. 

बारामती येथे संत गाडगेबाबा त्या वेळी आमच्याकडे आले होते. घरात ते थांबत नसत. त्यांनी आमच्याकडील गोठ्यात काही काळ घालविला. त्यांच्यापासूनच सामाजिक जाण माझ्यामध्ये निर्माण झाली. संत गाडगेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसाही अमरावतीला लाभला आहे, त्यामुळे ही पावन भूमी असल्याचे श्री.पवार म्हणाले. 

पवारांचा सल्ला मोलाचा : मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांना मी व चंद्रकांत पाटील भेटलो. त्यांच्या सल्ल्यानुसारच कर्जमाफीची योजना प्रत्यक्षात आणली. समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी त्यासोबतच शरद पवार यांनी विरोध केला; परंतु त्यांना या प्रकल्पातून होणारे फायदे कळाल्यानंतर त्यांचा विरोध आता मावळला आहे. रस्त्यांमुळे राज्याच्या विकासाला हातभार लागतो याची कल्पना श्री. पवार यांना आहे. त्यामुळेच त्यांनी आता याला विरोध करणे सोडले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...