agriculture news in marathi, Sharad Pawar, Fig processing plants can be started in Purandar | Agrowon

...तर अंजीर प्रक्रिया कारखाने पुरंदरसारख्या भागात निघतील
​श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 29 जानेवारी 2018

शरद पवार : पुरंदरला ‘अंजीर परिषदे’चे उद्‌घाटन
सासवड, जि. पुणे : टिकाऊ क्षमता व प्रक्रियेसाठी उपयुक्त अंजीर फळपिकाच्या जाती जगभरातून आणून राज्यातील अंजीर क्षेत्र वाढविणे शक्य आहे. अंजिरात संशोधन वाढवून त्याचा विस्तार केल्यास साखर कारखानदारीच्या तोडीचे अंजीर प्रक्रियेचे कारखाने पुरंदरसारख्या भागात निघतील, असा आशावाद माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. 

शरद पवार : पुरंदरला ‘अंजीर परिषदे’चे उद्‌घाटन
सासवड, जि. पुणे : टिकाऊ क्षमता व प्रक्रियेसाठी उपयुक्त अंजीर फळपिकाच्या जाती जगभरातून आणून राज्यातील अंजीर क्षेत्र वाढविणे शक्य आहे. अंजिरात संशोधन वाढवून त्याचा विस्तार केल्यास साखर कारखानदारीच्या तोडीचे अंजीर प्रक्रियेचे कारखाने पुरंदरसारख्या भागात निघतील, असा आशावाद माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. 

अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक आणि संशाेधन संघाच्या वतीने अंजीर फळपिक बदलाचे तंत्र, संशाेधन व विकासार्थ संपूर्ण एकदिवसीय पहिल्या ‘अंजीर परिषदे’चे आयाेजन रविवारी (ता. २८) काळेवाडी (ता. पुरंदर) येथे करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे होते. या वेळी अंजीर राज्य संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाखा, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिव सुरेश सस्ते, खजिनदार प्रदीप पोमण, कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जालिंदर कामठे, सभापती अतुल म्हस्के, अशोक टेकवडे, सुनील बोरकर, दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, देवेंद्र ढगे, डाॅ. विक्रम कड, डाॅ. विकास खैरे, डाॅ. सुनील लोहाटे, डाॅ. गणपत इधाते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अंजीर उत्पादनात नावलौकीक मिळविलेल्या शेतकऱ्यांचा ‘अंजीर रत्न’ पुरस्कार देऊन सत्कार झाला. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘मी जसे चाळीस दिवसांनंतरच पाणी द्यावे लागते, अशा ऊस जातीच्या पाहणीसाठी परदेशात जाणार आहे. त्याच पद्धतीने अंजिराची प्रक्रियायुक्त जात पाहण्यास तुर्कस्तानला जाणार आहे. माझी खात्री आहे, की तिथल्या मूल्य वाढविणाऱ्या जाती महाराष्ट्रात आल्या, तर अंजीर उत्पादकांचा कायापालट होईल.’’ 

राज्यमंत्री श्री. शिवतारे म्हणाले, ‘‘अंजीर संघाने पुढाकार घेतला. तसाच मी मंत्रीपातळीवर बैठकीसाठी पुढाकार घेतो. अंजीर फळपिकातील अडचणी, प्रश्न मांडा. आपण मुंबई व दिल्लीत जाऊन पाठपुराव्याने सोडवू. परदेशी वाण देशात आणताना अनेक जाचक अटी व नियम असतात, त्यासाठीच सरकारी पाठबळ लागते, ते मिळविण्यात मी पुढे असेल.’’ 
या वेळी सुनील बोरकर, सागर काळे, रवींद्र नवलाखा आदींनी मनोगते मांडली. प्रस्ताविक सुरेश सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले. तर आभार प्रदीप पोमण यांनी मानले. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...