agriculture news in Marathi, sharad pawar gave 1.5 crore for drought Man Taluka, Maharashtra | Agrowon

माणच्या दुष्काळ निवारणार्थ पवार यांच्याकडून दीड कोटी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

दहिवडी, जि. सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माणच्या दुष्काळासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आपल्या खासदार फंडातून देण्याचा निर्णय घेतला. हा निधी कोठे किती खर्च करायचा याची जबाबदारी त्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली आहे. 

दहिवडी, जि. सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माणच्या दुष्काळासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आपल्या खासदार फंडातून देण्याचा निर्णय घेतला. हा निधी कोठे किती खर्च करायचा याची जबाबदारी त्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली आहे. 

खासदार शरद पवार रविवारी (ता. १२) माण तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. येथील सात गावांत ते पाहणी करून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा कविता म्हेत्रे, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, रमेश पाटोळे, संदीप मांडवे, प्रवीण इंगवले, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव नामदेव भोसले, शिवाजीराव सर्वगोड आदी उपस्थित होते.

सकाळी शिंदी खुर्द येथे श्रमदानातून सुरू असलेल्या वॉटर कपच्या कामांना खासदार शरद पवार यांनी भेट दिली. तसेच कामावरील ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी श्री. पवार यांनी माण तालुक्‍यातील दुष्काळ निवारणासाठी स्वत:च्या खासदार फंडातून दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे पैसे कोठे किती खर्च करायचे याची जबाबदार राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली. या वेळी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधला.

संजयमामांना राजीनामा द्यावा लागेल
आणखी १२ दिवसांनी संजयमामा शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण १२ दिवसांनी संजयमामा आमच्यासोबत दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा खुलासा श्री. पवार यांनी करत तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना, असा प्रश्‍न उपस्थितांना विचारला. त्यावर सर्वांनी ''हो'' म्हणून उत्तर दिले. 
 

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...