गडकरी यांनी रेंगाळेलेल्या कामांना गती दिली : शरद पवार

राजगुरूनगर ते चाकण जाण्यासाठी दीड तास वेळ लागतो. मी हा अनुभव घेतला आहे. मला पायलट गाडी असूनदेखील ही परिस्थिती आहे. तर सामन्याचा किती वेळ वाया जातो याचा विचार व्हायला हवा," याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
गडकरी यांनी रेंगाळेलेल्या कामांना गती दिली- शरद पवार
गडकरी यांनी रेंगाळेलेल्या कामांना गती दिली- शरद पवार

पुणे : रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम गडकरी यांनी केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. 

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले, "जिल्ह्यातील अनेक रस्त्यांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र शहर व जिल्ह्यात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील 15 हजार लोक काम करतात. येथे तयार झालेली वाहने देशाबाहेर जातात. दिघी पुणे हा औद्योगिक जगाच्या बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे. पालखी मार्ग अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजगुरूनगर ते चाकण जाण्यासाठी दीड तास वेळ लागतो. मी हा अनुभव घेतला आहे. मला पायलट गाडी असूनदेखील ही परिस्थिती आहे. तर सामन्याचा किती वेळ वाया जातो याचा विचार व्हायला हवा," असे पवार यांनी सांगितले. 

यावेळी खासदार अनिल शिरोळे, आढळराव पाटील यांची भाषणे यावेळी झाली. हिंजवडीसह पुणे परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सल्लागार मदतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. सुरू असलेली व सुरू होणारी एकूण 1600 कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. NHAI कडून प्रथम असा कार्यक्रम सुरू झाला आहे. 

आढळराव म्हणाले, "बायपास रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्याच्या कामाला आज सुरवात झाली. खेड, सिन्नरचे काम 2013 मध्ये सुरू झाले होते. जुन्नर ते भिमाशंकर ओझर, लेण्याद्री राजगुरू नगर ह्या रस्ताच्या काम करावे. पूर्वी रस्त्यासाठी भांडावे लागत होते गडकरी मंत्री झाल्याने भांडण्याची गरज नाही. राज्याला जास्त निधी मिळत आहे."

गिरीश बापट म्हणाले, "पुण्यात येणारे मार्ग वाहतूक कोंडीचे आहेत. विमानतळावरील प्रवाशी 25 पटीने वाढले. पुण्यातील मेट्रोचे प्रत्यक्ष काम गडकरींमुळे सुरू झाले. रिंग रोडचे देखील काम सुरू होईल. पैसे नाही म्हणून रस्याची कामे थांबली नाहीत." 

प्रशस्त देखणा चांदणी चौक होणार आहे. गडकरी यांनी राज्यात मंत्री असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिमाण बदलून टाकले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  गडकरी यांनी बांधलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जगात प्रसिद्ध झाला. कोल्हापूरला बास्केट पूल होणार आहे. सातारा कागल रस्ता देखणा होणार आहे. कोल्हापुरातून पन्हाळा मार्गे रत्नागिरीला थेट हायवेवरून पूल होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com