येथील सिद्धराज सहकारी शेती पाणी पुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार.
येथील सिद्धराज सहकारी शेती पाणी पुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार.

उपसा सिंचन योजनांना वीज दर सवलतीसाठी प्रयत्न करू

सांगली ः महाराष्ट्रातील शेती खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संपन्न झाली पाहिजे. यासाठी उपसा सिंचन योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करणे आवश्‍यक असून, सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. वीज योजनेच्या सवलतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत खासदार संजय पाटील यांना घेऊन चर्चा करू, अशी ग्वाही शुक्रवारी (ता. ३) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली. कवठे एकंद (ता. तासगाव) येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम होते. या वेळी खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, सुमनताई पाटील, मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, की तासगाव ऐकीकाळी दुष्काळी तालुका ओळखला जायचा. आता पाणी आलं आहे. शेतकरी ऊस, द्राक्ष शेती पिकवू लागले आहेत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तास गणेश या वाणाचे संशोधन केले. या परिसरातील शेतकऱ्यांची जिद्द मोठी आहे. कवठे एकंद या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती पाणीपुरवठा संस्था सुरू केली. मात्र, या संस्थेकडून वार्षिक एकरी पाणीपट्टी ४४०० ते ५२०० रुपये आकारली जाते हे ऐकून धक्काच बसला. मी शंभर-सव्वाशे योजना राबविल्या. नीरा, कऱ्हावरून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी गेले. तेथे सुरवातीला पाणीपट्टी एकरी ७०० रुपये होती, ती आता २२०० ते २३०० रुपये झाली आहे. आम्ही १०० रुपये वाढवले तरी लोक दंगा करतात. येथे तब्बल ५२०० रुपये आकारणी होते, हे कसे? या योजना सुरू केल्या तुम्ही, त्यासाठी कर्ज काढले, ते फेडले. तुम्हीच पैसे भरता, तुम्हीच योजना चालवता, मग ५२०० रुपये पाणीपट्टी. हे अन्यायाचे धोरण आहे.  ‘‘स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांनी आखलेली धोरणे ही शेतकऱ्यांच्या हिताची होती. मात्र, सांगली जिल्ह्यातील ठराविक साखर कारखाने अडचणीत आहेत. कारखानदारी आणि शेतकऱ्यांसाठी चांगली बाब नाही. या संस्थेवर हजारो संसार चालताहेत, असेही त्यांनी सांगितले.  या वेळी आमदार जयंत पाटील, आमदार, पतंगराव कदम, खासदार संजय पाटील यांची भाषणे झाली. पाणीपुरवठा संस्थेचे नरेंद्र खाडे, बाबूराव लघारे, प्रवीण वठारे यांच्यासह अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com