agriculture news in Marathi, Sharad Pawar says government has 80 crore rupees for banks but not have for farmers, Maharashtra | Agrowon

बँकांसाठी ८० हजार कोटी आहेत, पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

सोलापूर : कर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना ८० हजार कोटी कसे दिले? सरकारकडे शेतकऱ्यांच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत आणि बँकांची तूट भरायला पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित करत, कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सुनावले. 

सोलापूर : कर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना ८० हजार कोटी कसे दिले? सरकारकडे शेतकऱ्यांच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत आणि बँकांची तूट भरायला पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित करत, कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सुनावले. 

अकलूज येथील रत्नाई महिला वसतिगृहाचे उद् घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ''शेतकऱ्यांचे डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, पण देशाचा विकासदर घसरला असून, कृषी आणि औद्योगिक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो, सरकार खाणाऱ्यांचा विचार करते, पण पिकवणाऱ्यांचा विचार झाला, तर खाणाराही जगेल.''

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ 
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू, असेही मत शरद पवारांनी या वेळी व्यक्त केले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...