दुष्काळाबाबत सरकार असंवेदनशील ः शरद पवार

राष्ट्रवादी सभा
राष्ट्रवादी सभा

पुणे ः दुष्काळात लाखो जनावरे चारा छावणीद्वारे जगवण्याच काम आपण केलं, मुख्यमंत्री मात्र चारा छावणी उभ्या करणार नसल्याचं सांगत आहेत. दुष्काळाच्या झळा सगळ्यांनाच बसत आहेत. मात्र सर्वाधिक त्रास शेतकरी आणि महिलांना होत असताना, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची तयारी सरकार दाखवत नाही. अशा असंवेदनशील सरकारच्या हातातले राज्य हिसकावून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राच्या संविधान बचावो - देश बचावो रॅलीत सोमवारी (ता.२९) पवार बोलत होते. या वेळी पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, आमदार, लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.  या वेळी शरद पवार म्हणाले की, केंद्रातील सरकारची सत्तेच्या गैरवापराची भूमिका असून, संविधानाची प्रतिष्ठा राखली जात नाही. गुन्हेगारीची सखोलात सखोल चौकशी करणाऱ्या सीबीआय सारख्या संस्थेच्या प्रमुखाला रात्री अपरात्री काढून टाकण्यात येत आणि ज्या व्यक्तींच्या गैरव्यवहारांच्या चौकशा सुरू आहेत अशा व्यक्तींना प्रमुखपदी बसवलं जातं. हा सत्तेचा गैरवापर आहे. दिवसेंदिवस अत्याचारांची संख्या वाढत आहे. लहान लहान घटकाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र कोणताच निर्णय सरकार घेत नाही. यामुळे देशीची स्थिती चिंताजनक झाली आहे. केरळमधील मंदिराबाबतच्या सर्वाोच्च न्यायालयाचे आदेशदेखील सरकार मान्य करत नाहीत. तर सरकारच्या पक्षाचे अध्यक्षांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही अशी वक्तव्ये ते करत आहेत. यामुळे संविधान वाचविण्याची गरज आहे. जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकार घटना दुरुस्ती आपल्या सोयीसाठी करत आहेत. तर सत्तेतील काही मंत्री आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहे अशी वक्तव्ये करत आहेत. घटना बदलातून सर्वसामान्य जनतेच्या आत्मसन्मानावर घाला घातल आहे. यामुळे सर्व देशच काळजीत आहे. केंद्र सरकार सीबीआयचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करत आहे. या वेळी फौजिया खान, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. तर मनुस्मृती आणि मतदान मशिनची होळी या वेळी करण्यात आली. तसेच विविध जिल्ह्यांच्या महिला अध्यक्षांना संविधान बचाव मोहिमेच्या मशाली सुपूर्त करण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com