agriculture news in Marathi, Sharad pawar says have got spirit for fight from kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरातून लढण्याचे बळ मिळाले : शरद पवार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. यामध्ये लढण्याचे बळ हे कोल्हापुरातून मिळाले यात माझ्या मामाच्या गावचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गोलीवडे (ता. पन्हाळा) येथे केले.

श्री. पवार यांनी रविवारी (ता. ११) गोलीवडे (ता. पन्हाळा) या त्यांच्या मामाच्या गावाला भेट दिली. ग्रामस्थांतर्फे त्यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो चांदीची मूर्ती देऊन गौरव झाला.

कोल्हापूर : माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. यामध्ये लढण्याचे बळ हे कोल्हापुरातून मिळाले यात माझ्या मामाच्या गावचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गोलीवडे (ता. पन्हाळा) येथे केले.

श्री. पवार यांनी रविवारी (ता. ११) गोलीवडे (ता. पन्हाळा) या त्यांच्या मामाच्या गावाला भेट दिली. ग्रामस्थांतर्फे त्यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो चांदीची मूर्ती देऊन गौरव झाला.

सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्‍किल टिप्पणी पवार यांनी केली. दिलखुलास संवाद साधला. पवार यांच्या स्वागतासाठी कोतोली फाट्यापासून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. गावात तर गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा झाला. पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म या गावातील भोसले कुटुंबामध्ये झाला.

भोसले कुटुंबीय काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले; परंतु ही आठवण पवार यांना माहिती असल्याने त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात या गावाला एकदा भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या दौऱ्यात त्यांनी ही भेट दिली. गावात सकाळपासूनच पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. गावातील महिलांनी हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या, तर पुरुषांनी कोल्हापुरी फेटे बांधले होते. तरुणांनी झांजपथकाच्या निनादात त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...