साखर उद्योगासाठी तातडीने प्रयत्न करा : पवार

शरद पवार
शरद पवार

नवी दिल्ली : अडचणीतल्या साखर उद्योगाला तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न लवकर सुुरू करावेत, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी (ता.२५) येथे केली. श्री. पवार यांच्यासह राष्ट्रीय साखर महासंघ, ‘विस्मा’च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. त्या वेळी श्री. पवार यांनी नव्याने हे पत्र पंतप्रधानांना दिले.  दोन दिवसांपूर्वीच आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी उत्पादनाच्या आधारावर थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदान देणे किंवा साखरेवर सेस लावून त्यातून ऊसदर स्थिरता निधी उभा करणे, इथेनॉलवरील जीएसटी कमी करण्याबाबत दिल्ली येथे साखर संघ, इस्माचे प्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक झाली होती. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर याचा पाठपुरावा करण्याबाबतची बैठक श्री. पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी श्री. पवार यांनी साखर उद्योगाचा आढावा घेताना यंदा साखर उद्याेगाची स्थिती प्रचंड बिकट झाल्याचे निदर्शनास आणून दिले.   श्री. गडकरी यांनी यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तातडीने याचा पाठपुरावा व्हावा, यासाठी श्री. पवार यांनी बैठकीनंतर लगेचच हे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र सुपूर्त केले. या वेळी विस्माचे उपाध्यक्ष श्री. ठोंबरे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रकाश नाईकनवरे, इस्माचे अविनाश वर्मा उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com