agriculture news in Marathi, Sharad pawar says, levy on sugar witch used in industries, Maharashtra | Agrowon

उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर लावावा : शरद पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी ६५ ते ७० टक्‍के साखर मिठाई, औषधे आणि शीतपेयांसाठी वापरण्यात येते. या साखरेवर सेस किंवा कर लावून ती रक्‍कम साखर कारखान्यांमार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी. साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणारा खर्च, तसेच व्याज शासनाने द्यावे. अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली होती. त्या वेळी आपण मंत्री असताना यातील काही निर्णय घेतले होते, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी ६५ ते ७० टक्‍के साखर मिठाई, औषधे आणि शीतपेयांसाठी वापरण्यात येते. या साखरेवर सेस किंवा कर लावून ती रक्‍कम साखर कारखान्यांमार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी. साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणारा खर्च, तसेच व्याज शासनाने द्यावे. अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली होती. त्या वेळी आपण मंत्री असताना यातील काही निर्णय घेतले होते, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘साखर दर घसरणीने उद्योग खूपच अडचणीत आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. यातून तातडीने मार्ग निघणे आवश्‍यक आहे. संपूर्ण भारतात साखरेचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यातच साखरेचे भाव पडले आहेत. 

त्यामुळे सध्या साखर उद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थामंत्री विलास पासवान व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांचा समावेश आहे. या समितीला आपण तीन सूचना केल्या आहेत. निर्यात करण्यासाठी वाहतूक खर्चात सवलत द्यावी, इथेनॉलचे भाव वाढवावेत, साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणाऱ्या खर्चासाठी केंद्राने आर्थिक मदत करावी, असे सांगितले आहे.

श्री. पवार म्हणाले, की केंद्र सरकारबद्दल देशभरात नाराजीचा सूर आहे. सरकारच्या धोरणामुळे सर्व घटकांत अस्वस्थता आहे. सर्वत्र मंदीचे संकट आहे. उत्पादक संकटात आहे, सामान्य माणूस संकटात आहे. गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत चालले आहे. हे चित्र चांगले नाही. यातून शेतकरीही सुटलेला नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. सरकारबद्दलची उद्विग्नता, संताप शेतकरी आत्महत्या करताना चिठ्ठीवर नावे लिहून व्यक्‍त करत आहेत. हे चित्र नक्कीच चांगले नाही. 

भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे. लोक बदलाला इच्छुक आहेत, मात्र आम्ही एकत्र राहू की नाही, याबद्दल लोकांमध्ये काळजी आहे. त्यामुळे आपण भाजपच्या विरोधात सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रथम राष्ट्रवादी व काँग्रेस महाराष्ट्रात एकत्र येऊन आमच्या फुटीचा फायदा भाजपला होणार नाही याची काळजी घेत असल्याचे श्री. पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

सरकारने मदत करणे आवश्यक
सध्या साखर उद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री विलास पासवान व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांचा समावेश आहे. या समितीला आपण तीन सूचना केल्या आहेत. निर्यात करण्यासाठी वाहतूक खर्चात सवलत द्यावी, इथेनॉलचे भाव वाढवावेत, साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणाऱ्या खर्चास केंद्राने आर्थिक मदत करावी असे सांगितले आहे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...