...ही परिवर्तनाची सुरवात आहे : शरद पवार

शरद पवार
शरद पवार

मुंबई   : देशाच्या संविधानावर, स्वायत्त संस्थांवर हल्ला झाला त्याबद्दल लोकांनी व्यक्त केलेली नाराजी निवडणूक निकालांमधून दिसते. शेतकरी, आदिवासींचा फटका बसेल असे वाटले होते. मात्र शहरी भागातही ५० टक्के त्यांना फटका बसला असून, ही परिवर्तनाची सुरवात आहे, असे मत व्यक्त करतानाच काँग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपविले ते लोकांनी मान्य केले आहे. भाजपला विरोध करायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.   ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. १२) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी श्री. पवार म्हणाले, की तिसरी आघाडी नाही, मात्र देशपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी आपले मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. हा केवळ चार राज्यांचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्या वेळी निवडणुका होतील त्या वेळी देशातील चित्र बदललेले दिसेल.

नुकताच चार राज्यांतील निवडणुकांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या निकालांबाबत भाजप सोडून इतर पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा पर्याय महत्त्वाचा आहे. भाजपने स्वायत्त संस्थांवर केलेला हल्ला लोकांना रुचलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर यांची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती, त्याचाही राजीनामा त्यांनी दिला आहे. सीबीआयमधील वाद समोर आला आहे. काही मर्यादा ठेवायला पाहिजेत. पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती ती ते विसरले आणि फक्त एक कुटुंब मांडत राहिले. ज्यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही, मात्र तरीही एका कुटुंबावर हल्ला करत राहिले, त्याचा हा परिणाम झाला आहे, असे श्री. पवार म्हणाले.

या निकालांमुळे शिवसेनेलाही बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीपर्यंत भाजप नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल, असे सांगतानाच तरीही निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील याबाबत शंका नाही, असा टोलाही श्री. पवार यांनी या वेळी शिवसेनेला लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com