agriculture news in Marathi, sharad pawar says, separate system needed for organic certificate, Maharashtra | Agrowon

सेंद्रीय प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी ः शरद पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पुणे:  सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी इतर राज्य आणि देशाचा विचार करावा. सेंद्रीय शेतमालाची विक्री करण्यासाठी मानांकन असावे. त्यासाठी कृषी विभागाकडे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र देणारी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. त्याशिवाय सेंद्रीय शेतमालाला चांगला दर मिळणार नाही, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.  

पुणे:  सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी इतर राज्य आणि देशाचा विचार करावा. सेंद्रीय शेतमालाची विक्री करण्यासाठी मानांकन असावे. त्यासाठी कृषी विभागाकडे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र देणारी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. त्याशिवाय सेंद्रीय शेतमालाला चांगला दर मिळणार नाही, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.  

महाआॅरगॅनिक अँड रेरिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) यांच्या वतीने पहिले विषमुक्त शेतमाल विक्री केंद्राचे उद्‌घाटन सोमवारी (ता.३) मगरपट्टा येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, ‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे, मगरपट्टा सिटीचे चेअरमन सतीश मगर, ‘मोर्फा’चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, प्रतिभा पवार, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की देशातील बहुतांशी ग्राहकांकडून सेंद्रिय शेतमालाला मागणी आहे. त्यांना चांगला शेतमाल देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळणार आहेत. मोठ्या ग्राहकांशी करार करण्यासाठी ‘मोर्फा’चा जन्म झाला आहे. शेतकऱ्यांनी या कंपनीचे सभासद व्हावे. आखाती देशांतून चांगल्या प्रतीच्या मालाला अधिक मागणी आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. विक्रीसाठी काही अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करण्यात येतील. परंतु, परदेशात विक्री करण्यासाठी सुरुवात तरी केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपण शेतमाल परदेशात विक्री करू शकणार आहोत. 

सच्चिंद्रप्रताप सिंह म्हणाले, ‘‘मोर्फा’च्या माध्यमातून सेंद्रिय शेतमालाचे केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतमालाला चांगले दर मिळण्यास मदत होईल. राज्यात कृषी विभागाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत मागील दोन-तीन वर्षांत सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय गट स्थापन करण्यात आले आहेत. त्याला चालना देण्यासाठी काही प्रमाणात अनुदान देण्यात आले. विभागाने शेतमालाला सर्टिफिकेशन देण्यासाठी पीजीएसची सुविधा आणली आहे. त्याचा सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  
 
अंकुश पडवळे म्हणाले, की सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी ‘मोर्फा’ची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुण्यातील विविध ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. हे पहिले केंद्र असून, हेल्दी हार्वेस्ट हा ब्रँड तयार केला आहे. 
कार्यक्रमात सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील, मोर्फाचे उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे यांनी प्रास्तविक केले. तर, विकी राठी यांनी आभार मानले. 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...