agriculture news in marathi, sharad pawar take a review of drought situation, pune, maharashtra | Agrowon

सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः शरद पवार
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण कृषिमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी आणि अन्नधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारकडे विनंती करणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण कृषिमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी आणि अन्नधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारकडे विनंती करणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे दुष्काळी स्थितीच्या पाहणीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री. पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल बागल, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, महारुद्र पाटील, ॲड. कृष्णाजी यादव यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने माऊली भोसले यांनी गावाला लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याचे टॅंकर वाढविण्याची व पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली. तसेच, खडकवासला कालव्याच्या पाण्यासंदर्भातील येणाऱ्या अडचणी सांगितल्या. या वेळी महादेव सूर्यवंशी, हनुमंतराव वाबळे, रवी पवार, विक्रम झगडे यांनीदेखील यासंदर्भातील आपली मते व्यक्त केली.यावर श्री. पवार यांनी टॅंकरच्या खेपा वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासला कालव्याच्या शेती सिंचनाच्या पाण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीची तसेच काय उपाययोजना करता येतील, याविषयीची माहिती श्री. पवार यांना दिली. यावरदेखील आपण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करू, असे आश्‍वासन श्री. पवार यांनी या वेळी दिले.

 चारा छावण्या सुरू करण्याची सूचना
इंदापूर तालुक्‍यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या आणि बाजार समितीच्या माध्यमातून सर्वांना मध्यवर्ती पडेल अशा जवळपास साठ ते आठ ठिकाणी पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची सूचना यासंबंधी प्रमुखांना श्री. पवार यांनी दिल्या. यावर श्री. भरणे यांनी तत्काळ या चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या.
 
‘भरणे आणि पाटील असल्यावर मताधिक्य मिळणारच’
बारामतीबरोबरच इंदापूर तालुक्‍याने सुप्रिया सुळे यांना दिलेल्या मताधिक्‍याबद्दल तालुक्‍याचे कौतुक आहे. आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असल्यावर मतधिक्‍य मिळणारच, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोघांचे कौतुक केले. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...