agriculture news in Marathi, Sharad pawar will Dialogue with farmers in vidrbha, Maharashtra | Agrowon

विदर्भातील शेतकऱ्यांशी शरद पवार साधणार संवाद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

नागपूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार १५ नोव्हेंबरपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी ते या दौऱ्यात संवाद साधतील.

शरद पवार बुधवारी (ता. १५) सकाही साडेनऊ वाजता विमानाने नागपूरला येतील. येथून लगेच गडचिरोलीला रवाना होतील. दुपारी एक वाजता येथील कार्यकर्ता मेळावा व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी ते संवाद साधतील.

नागपूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार १५ नोव्हेंबरपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी ते या दौऱ्यात संवाद साधतील.

शरद पवार बुधवारी (ता. १५) सकाही साडेनऊ वाजता विमानाने नागपूरला येतील. येथून लगेच गडचिरोलीला रवाना होतील. दुपारी एक वाजता येथील कार्यकर्ता मेळावा व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी ते संवाद साधतील.

येथून ते चंद्रपूरला रवाना होतील. चंद्रपूरला त्यांचा मुक्‍काम असून, १६ तारखेला चंद्रपूर येथील मेळावा तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ते शुक्रवारी (ता. १७) भेट घेतील. या वेळी बोंडअळीने बाधित शेतीची ते पाहणी करणार आहेत. दुपारी पक्षाचा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा व सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशीदेखील ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर वर्धे येथे शनिवारी (ता. १८) होणाऱ्या पक्ष मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजनादुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम...
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...