agriculture news in marathi, Shareholders of new co-operative organizations: Charegaonkar | Agrowon

नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल : चरेगावकर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. जेणेकरून महिलांना रोजगार निर्मितीसाठी वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. जेणेकरून महिलांना रोजगार निर्मितीसाठी वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कल्याणी महिला नागरी पतसंस्थेतर्फे आयोजित ‘श्रीमती कल्याणी’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी चरेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्षा शशी अहिरे, ‘भ्रमर’चे संपादक चंदुलाल शहा, डॉ. शरद महाले, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.

चरेगावकर म्हणाले, ‘‘महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायासाठी महिलांनी धाडस करणे गरजेचे आहे. व्यवसाय करण्यापूर्वी त्यामागील उद्देश, अर्थकारण, उत्पादन प्रक्रिया, आदी बाबींचा सखोल अभ्यास करावा.``
दरम्यान, मेळघाटमधील ‘संपूर्ण बांबू केंद्रा’च्या प्रमुख निरुपमा देशपांडे यांना ‘श्रीमती कल्याणी’हा द्वैवार्षिक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप होते. या वेळी काही उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अंजली पाटील यांनी केले. कल्पना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

बांबू उद्योगाने अर्थकारण बळकट
बांबू उद्योगामुळे मेळघाटला सकारात्मक ओळख मिळाली. सरकारी नोकरीवर पाणी सोडून मेळघाट गाठले. धारणी, चिखलदरा या भागात कामाला सुरवात केली. तेथील लोकजीवन व त्यांचे जगणे जवळून अनुभवत असताना त्यांच्यामधील कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पुढे बचत गटांची स्थापना झाली आणि बांबू लागवडीला प्रचार-प्रसार केला. बांबूपासून वर्षभर उत्पादन मिळत असल्यामुळे हा व्यवसाय येथील रहिवाशांनी घरोघरी सुरू केला. परिणामी मेळघाटचे अर्थकारण बळकट होण्यास मदत झाली, असे देशपांडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...