Agriculture News in Marathi, sheep breed introduce in chittor district, Andhra pradesh | Agrowon

आंध्र प्रदेशात होणार ‘नारी सुवर्णा'ची पैदास
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017
सातारा : फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या ‘नारी सुवर्णा'' या जातीच्या मेंढ्यांचे चित्तुर जिल्ह्यातील (आंध्र प्रदेश) मेंढीपालक आणि शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
 
आंध्र प्रदेश शासनाच्या ग्रामीण दारिद्रय निर्मूलन समितीतर्फे या मेंढ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ‘नारी` संस्थेने दिली. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात ‘नारी सुवर्णा'' जातीचे ५०० नर आणि ८०० मादी मेंढ्यांचे वाटप झाले आहे.
 
सातारा : फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या ‘नारी सुवर्णा'' या जातीच्या मेंढ्यांचे चित्तुर जिल्ह्यातील (आंध्र प्रदेश) मेंढीपालक आणि शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
 
आंध्र प्रदेश शासनाच्या ग्रामीण दारिद्रय निर्मूलन समितीतर्फे या मेंढ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ‘नारी` संस्थेने दिली. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात ‘नारी सुवर्णा'' जातीचे ५०० नर आणि ८०० मादी मेंढ्यांचे वाटप झाले आहे.
 
आंध्र प्रदेश शासनाच्या ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन समितीच्या उपक्रमांतर्गत ‘नारी सुवर्णा'' जातीच्या मेंढ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नारी संस्थेने नुकतेच २२ पैदासीचे मेंढे पाठविले आहेत. नारी संस्थेत गेली वीस वर्षे या जातीच्या मेंढ्यांची पैदास शास्त्रीय पद्धतीने केली जात आहे. या जातीच्या मेंढ्यांचा वाढीचा दर, रोग प्रतिकारकता आणि पुनर्उत्पादन क्षमता चांगली आहे. मेंढ्यांच्या अानुवंशिक सुधारणेसाठी ही जात चांगली असल्याची माहिती संस्थेतील तज्ज्ञांनी दिली. 
 
आंध्र प्रदेश शासनाने एक हजार शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून दहा लाख शेतकऱ्यांना संघटित केले आहे. त्यांच्या विकासासाठी कार्यक्रमाची आखणी करून प्रत्येकी ५०० ते १००० शेतकरी सभासद असलेल्या तीन उत्पादक संघटनांचे नऊ प्रतिनिधी नुकतेच फलटण येथे ‘नारी सुवर्णा'' जातीचे मेंढे निवडण्यासाठी आले होते.
 
‘नारी सुवर्णा`मुळे होणार जुळी, तिळी कोकरे
सध्या चित्तुर जिल्ह्यातील मेंढपाळ हे नेल्लोर जोडीपी जातीच्या मेंढ्यांचे पालन करतात. या मेंढ्या एका वेताला एकच कोकरू देतात. त्यामुळे मेंढपाळांना फारसा आर्थिक फायदा होत नाही.
 
‘नारी सुवर्णा''च्या नरामधील जुळी कोकरे देणारा जनुक पुढील पिढीत संक्रमीत होणार आहे. त्यामुळे या नरापासून जन्मणाऱ्या माद्यांना जुळी व तिळी कोकरे होतील. त्यातून मेंढपाळांच्या उत्पन्नात ३० ते ६० टक्के वाढ होईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती नारी संस्थेच्या डॉ. चंदा निंबकर यांनी दिली.

इतर बातम्या
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...