राज्यातील ७४ पाणलोट अतिशोषित : शेखर गायकवाड

विहिर
विहिर

पुणे : भूजलाच्या अनिर्बंध उपशामुळे राज्यातील एकूण १५३१ पाणलोटांपैकी बारा जिल्ह्यांतील ७४ पाणलोट अतिशोषित आहेत, तर आणखी १०४ पाणलोट अतिशोषित होण्याचा मार्गावर आहेत. या भागात भूजलच्या उपशाचे प्राधान्याने व्यवस्थापन करावे लागणार आहे. तसेच, पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण आणि जतन करणे आवश्‍यक असून, शुद्धतेबाबत निकषांनुसार यापुढे पिण्याच्या पाण्याचा दर्जा संभाळावा लागणार असल्याची माहिती भूजल विकास अाणि सर्वेक्षण यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी दिली.   भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमनाच्या अंमलबजाणीचे नियम राज्य सरकारने हरकती अाणि सूचनांसाठी प्रसिद्ध केले आहेत. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात जवळपास ८२ टक्के सिंचन क्षेत्र भूजलावर अवलंबून आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, नाशिक, नगर, जळगाव जिल्ह्यांच्या काही पाणलोटांत दरवर्षी पुनर्भरण होणाऱ्या पाण्याचा पूर्णपणे उपसा होत आहे. तसेच, काही पाणलोटांत त्यापेक्षा अधिक उपसा होत असल्याचे दिसून आले आहे. या जिल्ह्यांतील ७४ पाणलोटांबरोबच इतरही १०४ भूजलांचा उपसा वाढल्याने ते अतिशोषित होण्याच्या मार्गावर आहेत. या पाणलोटांमध्ये पाण्याचा उपसा करण्यावर निर्बंध आणणे आवश्‍यक आहे. भूजल अधिनियमाच्या अंमलबजावणी नियमांच्या निश्‍चितीनंतर प्राधान्याने या भागात उपाशाच्या व्यवस्थापनावर भर देण्यात येईल.  राज्यातील प्रत्येक गावात एक निरीक्षण विहीर निश्‍चित करण्यात आली असून, यापुढे गावनिहाय पाणी पातळीची स्थिती उपलब्ध होणार आहे. त्यानुसार त्या गावातील पिकांचे नियोजन करता येणार आहे. याचबरोबर या गावातील पिण्याच्या पाण्याचा दर्जा निश्‍चित करून दिला जाणार आहे. त्यानुसारच नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत, पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण व जतन न झाल्यास त्याविरोधात नागरिकांना दाद मागण्याचा, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकारही नव्या भूजल कायद्याने मिळणार आहेत. सध्या राज्यात तपासणी करण्यात आलेल्या सहा लाख पाण्याच्या नमुन्यांपैकी बहुतांशी भागात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे; तर यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे, असेही गायकवाड यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com