agriculture news in marathi, Shetkari jagar manch to fight against Farmers exploitation | Agrowon

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध शेतकरी जागर मंचचा आता लढा
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

अकोला : केंद्र व राज्य सरकारच्या शेती आणि शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध पेटून उठलेल्या शेतकरी जागर मंचच्या लढ्याला शेतकऱ्यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. कर्जमाफी, तूरीचे आंदोलनानंतर आता एक डिसेंबर रोजी होणाऱ्या कापूस-सोयाबीन परिषदेच्या माध्यमातून शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यासाठी शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. 

अकोला : केंद्र व राज्य सरकारच्या शेती आणि शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध पेटून उठलेल्या शेतकरी जागर मंचच्या लढ्याला शेतकऱ्यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. कर्जमाफी, तूरीचे आंदोलनानंतर आता एक डिसेंबर रोजी होणाऱ्या कापूस-सोयाबीन परिषदेच्या माध्यमातून शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यासाठी शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. 

निसर्गाची अवकृपा, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि वाढत्या महागाईमुळे कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यान शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला असून यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढत आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची ही दैनावस्था दुर करून त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी अकोल्यात शेतकरी जागर मंचने पुढाकार घेतला आहे. 

जिल्ह्यातील काही बिगर राजकीय व्यक्तींनी एकत्रित येत स्थापन केलेल्या शेतकरी जागर मंचने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारत सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफी संदर्भातल्या जाचक अटी, सोयाबीनचा बोनस, तूरी खरेदीत होणाऱ्या अडवणूकीविरुद्ध आंदोलनाचे रान शेतकरी जागर मंचने पेटविले होते. त्याचबरोबरच शेतकऱ्यांना त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध संघटीत करून जनजागृती करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, खासदार नाना पटोले यांचा अकोल्यात शेतकरी संवाद घडवून आणण्यासाठी जागर मंचने पुढाकार घेतला होता. 

आता एक डिसेंबरला कापूस-सोयाबीन परिषदेच्या माध्यमातून सरकारविरुद्ध मोठा संघर्ष उभा करण्याची तयारी जागर मंचने सुरू केली आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, राजू मंगळे, शेख अन्सार, विजय देशमुख, डी. एस. सुलताने, दिलीप मोहोड, डी. गावंडे, रंगराव टेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते गावागोवी सभा घेऊन जनजागृती करीत आहेत. आता पर्यंत जागर मंचतर्फे सुमारे पन्नासच्या वर गावात सभा झाल्या असून 150 गावांमध्ये सभा घेऊन आपल्या न्याय, हक्कासाठी शेतकऱ्यांनी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांकडून वर्गणी जमा 
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी जागर मंचने उभारलेल्या लढा हा बिगर राजकीय असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला शेतकऱ्यांनी बळ देण्यासाठी तसेच आंदोलन, परिषदेच्या आयोजनासाठी शेतकऱ्यांकडून वर्गणी जमा करण्यात येत आहे. ज्या गावात सभा असेल तेथे शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकरीही एक रुपया ते किमान 100 रुपये वर्गणी स्वयंस्फूर्तीने देत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...