agriculture news in marathi, Shetkari Sangatana declares agitation on 14th may | Agrowon

शेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेचा समाराेप शुक्रवारी (ता.२७) महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. सुकाणू समितीचे सदस्य व बळिराजा शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष का.िलदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.  

पाटील म्हणाले, ‘‘सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरत असताना सरकारला घाम फुटायला पाहिजे. पण, हे सरकार असंवेदनशील असून, सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी १४ मे च्या जेल भरो आंदोलनात जातिभेद, पक्षभेद विसरून एक शेतकरी म्हणून सहभागी व्हा. सरकारच्या विरोधात एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी एकतेची गरज आहे. शेतकरी संघ.िटत झाला, तरच सरकारचे डाेळे उघडणार असून, महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसणार आहे.’’

‘‘एकीकडे सरकारने कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र, ही कर्जमाफी अटी व शर्तींमध्ये अडकवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांना शेतीप्रश्‍नांवर बाेलण्यासाठी वेळ नाही. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी १४ मे च्या जेल भराे आंदाेलनात ५ लाख शेतकरी स्वतःला अटक करून घेणार आहेत. शेतकऱ्यांनी कुटुंबासह स्वतःला अटक करून घ्यावे,’’ असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.

२३ मार्च या शहीद दिनापासून सांगली येथून निघालेल्या यात्रेने २७ जिल्ह्यांमधून ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करून समाराेप महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकऱ्यांनी मनाेगते व्यक्त केली. 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...