agriculture news in marathi, shetkari Sanghatana demands aid for bolworm affected farmers | Agrowon

बौंडअळी, कापूस बियाणे, कर्जमाफीप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे निवेदन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

जळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतनिधी मिळावा, कापूस बियाणे लवकरात लवकर विक्री सुरू करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे पारोळा (जि. जळगाव) येथे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. 

जळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतनिधी मिळावा, कापूस बियाणे लवकरात लवकर विक्री सुरू करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे पारोळा (जि. जळगाव) येथे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. 

कापूस बियाण्यासंबंधी शेतकरी संभ्रमात आहेत. खानदेशात कापूस लागवड थांबली आहे. शेतकऱ्यांचे मागील हंगामात गुलाबी बोंड अळीने कोट्यवधींचे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांना मदतनिधी मिळालेला नाही. शासनाने जी मदत पूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार कार्यवाही व्हावी. हेक्‍टरी ३८ हजार व हेक्‍टरी ३० हजार रुपये मदतनिधी देण्याचे सरकारने म्हटले होते. कापूस उत्पादकांना न्याय मिळत नसल्याने ते अडचणीत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

खरिपात कापूस लागवडीबाबत योग्य ते मार्गदर्शन कृषी विभागाने करायला हवे. तालुका कृषी अधिकारी शीतल कवर यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कृषी अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, जितेंद्र पाटील, मल्हार कुंभार, अमोल पाटील, भूषण पाटील, प्रवीण पाटील, वेदांत पाटील, शिरीष पाटील, पांडुरंग पाटील, सोनुसिंग पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...