agriculture news in marathi, Shetkari Sanghatana to protest on farmers issues | Agrowon

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार- खासदारांच्या घरांसमोर निदर्शने’
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा, अन्यथा राज्यातील साखर कारखान्यांच्या गेटवर सुकाणू समितीतर्फे साखर अडविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३ जानेवारी रोजी आमदार- खासदारांच्या घरासमोर निदर्शने केली जाणार आहेत, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे सुभाष काकुस्ते यांनी शनिवारी (ता. १५) येथे यांनी दिली.

परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा, अन्यथा राज्यातील साखर कारखान्यांच्या गेटवर सुकाणू समितीतर्फे साखर अडविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३ जानेवारी रोजी आमदार- खासदारांच्या घरासमोर निदर्शने केली जाणार आहेत, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे सुभाष काकुस्ते यांनी शनिवारी (ता. १५) येथे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीची बैठक शनिवारी (ता. १५) येथे आयोजित करण्यात आली होती, या वेळी काकुस्ते यांनी बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती दिली. बैठकीस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, कष्टकरी शेतकरी संघाचे श्री. काकुस्ते, शेतकरी संघर्ष समितीच्या प्रा. सुशीला मोराळे, गंगाभीषण ठावरे, बळिराजा शेतकरी संघाचे गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, किसान मंचचे मधुसूदन म्हात्रे, नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बंडू सोळंके, जिल्हाध्यक्ष माउली कदम, अनंत कदम, विश्वंभर गोरवे, उद्धव शिंदे आदींसह १५ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. काकुस्ते म्हणाले, की या बैठकीमध्ये राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीचा विभागवार आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करत असताना दुजाभाव केला आहे. दुष्काळी स्थिती असताना एकाच तालुक्यातील अनेक मंडळांना वगळण्यात आले. गुरांच्या चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावात रोजगार नसल्यामुळे स्थलांतर वाढले आहे. गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा. चारा छावण्या गैरसोयीच्या आहेत, त्यामुळे पशुगणना करून गुरांच्या चारा- पाण्याची व्यवस्था गावातच करावी. दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यास प्रतिमहिना ५ हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता देण्यात यावा. शेतकऱ्यांपेक्षा शासनाच्या अनुदानामुळे पीकविमा कंपन्यांचे हित साधले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आयुर्विम्याप्रमाणे पीकविमा संरक्षण घेण्यासाठी विमा कंपनी निवडीचे स्वातंत्र्य देण्यात यावे. शेतकरी सुकाणू समिती कार्यरत राहणार आहे.

‘कारखाना गेटवर साखर अडविणार’
शेतकऱ्यांचा अजेंडा राबविण्यासाठी वेगळी राजकीय आघाडी स्थापन करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्याबाबतचा ठोस निर्णय पुढील बैठकीमध्ये घेतला जाईल. तूर्त एफआरपीनुसार दर न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या गेटवर साखर अडविणे, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीन जानेवारीला राज्यातील आमदार- खासदारांच्या घरासमोर निदर्शने केली जाणार आहेत, असे काकुस्ते यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...