agriculture news in marathi, Shetkari Sanghatana to take protest meet in villages | Agrowon

गावोगावी घेणार निषेध सभा : शेतकरी संघटना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

कऱ्हाड, जि. सातारा  : धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असून, याबद्दल सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटना व कामगार सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी गावोगावी निषेध सभा घेण्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

कऱ्हाड, जि. सातारा  : धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असून, याबद्दल सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटना व कामगार सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी गावोगावी निषेध सभा घेण्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

येथील कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळून तहसील कार्यालयात जाऊन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, बळिराजाचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, कामगार संघटनेचे अनिल घराळ यांच्यासह विक्रम थोरात, पोपट जाधव, काकासाहेब शिंदे, प्रताप पाटील, प्रदीप मोहिते, प्रमोद जगदाळे, सागर कांबळे, दिलीप कोठावळे, योगेश झांबरे आदींच्या वतीने सोमवारी (ता. २९) तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोमवारचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी घटना घडली आहे. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पहिला बळी धर्मा पाटील यांच्या रूपाने गेला आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असून, सरकारवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर गावागावांत सरकारच्या निषेध सभा आयोजित करून धर्मा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करणार आहोत, असाही इशारा संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...