शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

शेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अाहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मंगळवारी (ता. १२) शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त आयोजित शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केट यार्डाच्या मैदानावर झालेल्या या मेळाव्याला अॅड. वामनराव चटप, सरोज काशीकर, माजी आमदार गुणवंत पाटील, एकनाथ पाटील, महेंद्र कचोले, गंगाधर मुटे यांच्यासह इतर उपस्थित होते. या वेळी ॲड. चटप म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही. तो संकटात आहे. सध्या सातत्याने नैसर्गिक फटका बसतो अाहे. पण शेतकऱ्याला कुठलीही ठोस मदत मिळत नाही. शेतकरी मेहनत करतो, पण त्याच्या मालाचे दर दुसरेच ठरवितात. यामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या शेती अाणि धान्य यामधे सरकारी हस्तक्षेप थांबवावा, निर्यात शुल्क वाढवावे, निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात यावेच आदी मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुढील काळात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अॅड. चटप यांनी सांगितले. या मेळाव्याला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com