agriculture news in Marathi, shetkari sanghtna aggressive for sugarcane rate in solapur district, Maharashtra | Agrowon

सोलापुरात ऊस दरप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा अद्यापही न सुटल्याने शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवण्याचा प्रयत्न विविध शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना या संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आक्रमक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गाळप सुरू झाले, तरी त्यात विस्कळितपणा आला आहे. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा अद्यापही न सुटल्याने शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवण्याचा प्रयत्न विविध शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना या संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आक्रमक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गाळप सुरू झाले, तरी त्यात विस्कळितपणा आला आहे. 

साखर कारखानदार आणि सहकारमंत्र्यांची मिलीभगत आहे. ऊसदराचा तोडगा काढण्यात सहकारमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे येत्या बुधवारी (ता. १५) सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील घरासमोर १५ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचे तीन साखर कारखाने आहेत. त्यांनी ऊसदराची कोंडी फोडणे आवश्‍यक असताना, मंत्र्यांनीच जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांप्रमाणे मौन बाळगले आहे. सहकारमंत्र्यांची जिल्ह्यातील साखर कारखानदारांबरोबर असलेली मिलीभगत या निमित्ताने समोर आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात ऊसदराचा तिढा आणखी वाढला आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिली उचल दोन हजार ७०० रुपये घेतल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.

‘प्रहार’कडून ऊसतोड बंद 
उसाला तीन हजार ४०० रुपये दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्‍यात प्रहार संघटना कुरनूर धरणपट्ट्याच्या क्षेत्रात आक्रमक झाली. तालुकाध्यक्ष राजसाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड थांबविण्यात आली, यात या भागातील सर्व शेतकऱ्यांना सामावून घेत आंदोलन केले. चुंगी, किणी, हन्नूर, बोरेगाव, बऱ्हाणपूर, चपळगाव, बावकरवाडी, कुरनूर येथे तोड थांबवण्यात आली. या आंदोलनाबाबत चव्हाण म्हणाले, मंत्री व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मताची आठवण ठेवावी व तीन हजार ४०० रुपये दर देण्याचा सकारात्मक विचार करावा. गुजरातला प्रतिटनाला चार हजार ४४१ रुपये दर आहे, मग महाराष्ट्रातच कमी का, याचा विचार सरकारने करावा. 

पंढरपुरात ‘स्वाभिमानी’चे उपोषण
पंढरपूर तालुक्‍यात ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवारी चौथ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच आहे. दरम्यान, उपोषणाकडे अद्यापही जबाबदार प्रशासकीय अधिकारी फिरकला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. पहिली उचल तीन हजार ४०० रुपये जाहीर केली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी व्यक्त केला. सरकारने हस्तक्षेप करून ऊसदराचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

शुक्रवारी ‘लोकमंगल’वर ठिय्या
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकरी संघटनाही येत्या शुक्रवारी (ता. १७) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करणार आहे, असे उमाशंकर पाटील यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...